हिंदू धर्मांतर करण्यामागील कारण !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी.असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वसामर्थ्यवान असूनही भारताने इतिहासात एकाही देशावर आक्रमण न करण्याचे कारण

‘भारत सोडून जगातील इतर सर्वच राष्ट्रांनी दुसर्‍या राष्ट्रांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आपली शक्ती वापरली आहे आणि अजूनही वापरत आहेत. याउलट त्रेता आणि द्वापर या युगांत भारत जगात सर्वसामर्थ्यवान असतांनाही भारताने एकाही देशावर आक्रमण केले नाही. याचे कारण हे की, भारतातील हिंदु धर्मामुळे त्या युगांतही सर्वांचे लक्ष ईश्वरप्राप्तीकडे आणि ऋषीमुनींचे लक्ष ‘१४ विद्या आणि ६४ कला यांच्या … Read more

सांप्रतकालीन शालेय शिक्षणाची व्यर्थता !

‘सध्या शाळेत गणित, भूगोल, अर्थशास्त्र इत्यादी अनेक विषय शिकवतात. त्यांपैकी बहुतेक विषयांचा जीवनात १ टक्काही लाभ होत नाही. असे आहे, तर विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा उर्वरित वेळ वरील विषय शिकवण्यापेक्षा समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ – सच्चिदानंद परब्रह्म … Read more

हिंदूंचे धर्मांतरच होऊ नये, यासाठी प्रयत्न करा !

‘धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचे कार्य करण्यापेक्षा ‘हिंदू धर्मांतरित होणार नाहीत’, हे कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात भ्रष्टाचार, बलात्कार इत्यादी का नसेल ?

‘हिंदु राष्ट्रातील शाळांत भूगोल, गणित, रसायनशास्त्र इत्यादी आयुष्यात काही उपयोग नसलेल्या विषयांपेक्षा ‘मुले सात्त्विक कशी होतील’ याचे, म्हणजे ‘साधना कशी करायची’ याचे शिक्षण दिले जाईल. त्यामुळे रामराज्यात नव्हते, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी हिंदु राष्ट्रात नसेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या फलश्रुतीच्या संदर्भातील दृष्टीकोन !

‘जेव्हा हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपण सर्व जण मागील बाकड्यांवर (बॅकबेंचर) बसलेले असू आणि हिंदु राष्ट्राचे विजय ढोलक वाजवणारे दुसरे कुणीतरी असतील ! आपल्याला केवळ समाधान असेल की, आपण काळानुसार कार्य केले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

भौतिक विकासापेक्षा आत्मिक विकास श्रेष्ठ !

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

एकरूपतेची प्रक्रिया !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र, म्हणजेच ईश्वरी राज्य !

हिंदु राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापि ‘हिंदु राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र … Read more

सात्त्विक आचरण करतो, तो हिंदु !

‘जो रज-तमात्मक हीन गुण आणि त्यामुळे घडणारी कायिक, वाचिक अन् मानसिक स्तरांवरील हीन कर्मे यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच सात्त्विक आचरण करतो, तो ‘हिंदु’ !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)