धर्मातील आश्रमप्रणालीचा अर्थ !

‘हिंदु धर्मात ‘वर्णाश्रम’, म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जीवनपद्धत सांगितली आहे. त्यातील वर्ण म्हणजे जात नव्हे, तर साधनेचा मार्ग. आश्रम चार आहेत – १. ब्रह्मचर्याश्रम, २. गृहस्थाश्रम, ३. वानप्रस्थाश्रम आणि ४. संन्यासाश्रम. त्यांचा अनुक्रमे अर्थ आहे – १. ब्रह्मचर्यपालन, २. गृहस्थजीवनाचे पालन, ३. गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुनीवृत्तीने वनात रहाणे आणि ४. संन्यासजीवनाचे पालन. या चारही … Read more

कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले विविध धर्म (पंथ), तर कुठे अनादि हिंदु धर्म !

गेल्या १४०० वर्षांपूर्वी या जगात एकही मुसलमान नव्हता, २१०० वर्षांपूर्वी या जगात एक ख्रिस्ती नव्हता, २८०० वर्षांपूर्वी या जगात एकही बौद्ध वा जैन नव्हता आणि ३५०० वर्षांपूर्वी या जगात एकही पारसी नव्हता; मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच … Read more

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे माहात्म्य !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्‍वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मकार्य करण्याचे महत्त्व !

‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जागृत हिंदूंना दिशा देणे आवश्यक !

‘कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आगामी हिंदु राष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचा निकष !

‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी सद्य:स्थिती !

‘गायींची हत्या झाली, तर गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांना त्याचे काही वाटत नाही आणि गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला, तर गोरक्षकांना त्याचे काही वाटत नाही ! प्रत्येकाला ‘हिंदूंचे सर्व प्रश्‍न माझेच आहेत’, असे वाटेल, तेव्हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने हिंदूंची वाटचाल होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले