हिंदुस्थानची दुर्दशा संपवून पुन्हा उत्कर्ष करावयाचा उपाय म्हणजे धर्माधिष्ठित शिक्षण

आमच्या शिक्षणपद्धतीत आमच्या धारणा हव्यात. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आमच्या पाप-पुण्य, परलोक, ऋषीसृष्टी, पितरसृष्टी, देवसृष्टी, स्वर्ग-नरक, दृष्ट-अदृष्ट अशा धारणा असायला हव्यात. सगळ्या विषयांत या धारणा हव्यात. अगदी गणित-व्याकरणापासूनच्या पुस्तकांतून असे दृष्टांत हवेत. हिंदुस्थानभर चालू असलेला मिताक्षरा कायदा असायला हवा. त्यानुसार विवाह, दायभाग, दत्तक वगैरे निर्णय व्हावेत. ग्रहणादीपर्वकाळाचे अनुसरण व्हावे. मुलींच्या शाळेत ‘अश्वत्थ’ असावा. अभ्यासाला प्रारंभ … Read more

आजचा समाज

अ. ईश्वरप्राप्तीच्या ज्ञानाऐवजी केवळ भाकरीच्या तुकड्याला महत्त्व देणारा समाज ! विद्येचे रक्षण करणाऱ्या वर्गाचा सन्मान आणि योगक्षेम चालवायला तत्पर अशा विद्यासंरक्षक वर्गाला जिवंत ठेवण्याकरिता समाज ज्या प्रमाणात कटीबद्ध राहील, त्या प्रमाणात तो समाज प्रगमनशाली असतो. आजचे भाकरीचे तत्त्वज्ञान या दृष्टीकोनातून तपासून पाहा. आपण किती अधःपतीत होत आहोत, झालो आहोत आणि होणार आहोत, ते सहज ध्यानी … Read more

दिशाहीन सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास करणारा हिंदू समाज !

आजच्या हिंदू समाजाइतका भांबावलेला आणि आत्मघातकी समाज संपूर्ण भूतलावर नसेल. यामुळे त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास दिशाहीन झाला आहे. हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला येणे, या पलीकडे हिंदू होण्याकरता काहीच पात्रता लागत नाही. (त्रैमासिक सद्धर्म, ऑक्टोबर २००५)

साधनेची अत्यावश्यकता !

आपण स्वतःलाच जिथे साधनेशिवाय जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही, तिथे भारतमातेला आणि हिंदु धर्माला आक्रमकांपासून काय मुक्त करणार ? – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

मतदान करावे लागणारी ही शेवटची निवडणूक ठरो !

विज्ञानाने मानवाचा अभ्यास करणारी अनेक यंत्रे शोधली आहेत. पुढे त्रिगुणांपैकी व्यक्तीतील प्रधान गुण दर्शवणारे यंत्र शोधले की, निवडणुकीला उभे असणार्‍यांपैकी सात्त्विक कोण ?, हे यंत्र दर्शवील. तो उमेदवार निवडणुकीत जिंकला, असे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे लोकांना खोटी आश्‍वासने देऊन निवडून येता येणार नाही आणि निवडणुकांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च राष्ट्रासाठी वापरता येईल. – डॉ. आठवले … Read more

कुटुंबपद्धती नसण्याने होणारे तोटे

अ. स्त्री-पुरुषांना कायद्याने समान हक्क देण्याने कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांचा विध्वंस ! स्त्री आणि पुरुष यांच्यातील अंतर मिटवण्याचा सहेतुक प्रयत्न झाला, तर त्याचा परिणाम दुःख आणि व्याधीत होणे अपरिहार्य आहे. सर्वच क्षेत्रांत स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क देण्यासंबंधीचा आग्रह धरण्याने आणि तसे कायदे करण्याने कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचाही विध्वंस होईल. आ. स्त्रीला पुरुषी … Read more

कुटुंबकर्ता घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे समाज आणि राष्ट्र यांची व्यवस्था करणारे नेते हवेत !

कुटुंबातच तर सहिष्णुता श्‍वासाश्‍वासातून उमटू शकते. घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था केल्यावर कुटुंबकर्ता आपल्या भोजनादीचा विचार करतो. हेच सूत्र समाज आणि राष्ट्र यांच्या स्थैर्याकरिताही आवश्यक नाही का ? तसेच ग्रामपती हा जर आदर्श कुटुंबघटक असेल, कुटुंबांचे व्यवस्थापन करणारा असेल, तर गावाच्या लोकांचे भोजन आणि निवारा यांचा प्रबंध केल्यावरच स्वतःचे जेवण आणि वस्त्र यांचा … Read more

धर्मद्रोह्यांची देणगी:दुर्योधनाची प्रशंसा करणारी एक कादंबरी !

दुर्योधनाची प्रशंसा करणारी एक कादंबरी गुरुदेवांना दाखविली ते म्हणाले, “महाभारत, रामायण आदी इतिहासातील आमच्या काळ्या व्यक्तीरेखा, मुद्दाम उजळ करून त्यांना प्रतिष्ठित करण्याची गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत अनेकांनी कसोशी केली. साक्षात व्यास दुर्योधनासंबंधी सांगतात कंलेरंशस्तु संजज्ञे भुवि दुर्योधनो नृपः ।दुर्बुद्धिःदुर्मतिश्चैवैव, कुरूणामयशस्करः । जगतो यस्तु सर्वस्य विदिष्टा कालपुरुषः । यः सर्वां घातमायास पृथिवीं पृथिवीपते । (महा. आदिपर्व) राजा … Read more

विभक्त कुटुंब आणि भारताचे विभाजन !

बर्‍याच पती-पत्नींचेच एकमेकांशी पटत नाही. अशा स्थितीत ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहू शकत नाहीत. असे पती-पत्नी समाजाशी आणि राष्ट्राशी कसे एकरूप होणार ? अशा विभक्त कुटुंबांमुळे भारताचे विभाजन होण्यास साहाय्य होत आहे ! – डॉ. आठवले (६.५.२०१४)

अधर्म म्हणजे पुरोगामित्व !

नीती, प्रामाणिकपणा, अस्मिता वगैरेंचा लेशदेखील या युरोपियन गोर्‍यांत आढळायचा नाही. अधर्म हा धर्म झाला आहे. यालाच पुरोगामित्व म्हणतात. तीच प्रगती ! तीच आधुनिकता ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (आचारधर्म, पृ. ८.)