मुसलमान मक्केला आणि हिंदू साधू-संत कुंभमेळ्याला एकत्र येण्यातील भेद

मुसलमान मक्केला एकत्र येऊन जगातील सर्व मुसलमानांशी मैत्री करतात आणि पुढचे धोरण ठरवतात. याउलट अनेक हिंदू साधू-संतांत कुंभमेळ्याला एकत्र आल्यावर मोठेपणा मिरवायची चढाओढ असते ! – (प.पू.) डॉ. आठवले (२५.१२.२०१४) साधू-संतांपैकी फक्त २० टक्केच खरे साधू-संत असतात ! – (प.पू.) डॉ. आठवले (२५.१२.२०१४)

हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.

भावार्थ : ‘हे असे आहे का ?’ मधील ‘हे’ मायेविषयी आहे. ‘ते तसे आहे का ?’ मधील ‘ते’ ब्रह्मासंबंधी आहे. ‘हे असेही नाही, तसेही नाही’, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि ‘तशीही नाही’ म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ‘ते कशात नाही ?’ म्हणजे ब्रह्म सर्वत्र … Read more

सांप्रदायिक साधना करणार्‍यांनो, धर्माचाही अभ्यास करा !

सांप्रदायिक साधना करणार्‍यांना त्यांचा संप्रदाय सोडून हिंदु धर्मासंदर्भात इतर काहीच माहिती नसते. त्यामुळे कोणी अध्यात्मातील प्रश्‍न विचारायला लागला, तर त्यांना उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे प्रश्‍न विचारणार्‍याला वाटते, यांच्या साधनेत काही अर्थ नाही. असे व्हायला नको यासाठी, तसेच समाजातील व्यक्तींना साधनेकडे वळवण्यासाठी, म्हणजेच समष्टी साधना करण्यासाठी अध्यात्माच्या विविध अंगांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. – (प.पू.) … Read more

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात समाजात होत जाणारे विविधांगी आमूलाग्र पालट

वर्ष २०२३ भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन होईल. त्यानंतर पुढील ५० वर्षांत हिंदु समाजात विविधांगी आमूलाग्र पालट होतील. हे पालट अभ्यासल्यानंतर हिंदु राष्ट्रातच मानवाची खरा विकास किंवा प्रगती होईल, असे आज म्हणता येईल. १. सामाजिक समस्यांचे निर्मूलन १ अ. गुंडगिरी, चोर्‍या, दरोडे, हत्या, बलात्कार आदी गुन्हेगारीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल. १ आ. उपासमारी, कुपोषण … Read more

कुठे शोधिसी रामेश्‍वर अन् कुठे शोधिसी काशी ।

अशी गीते लिहून कवींनी आणि ती वारंवार ऐकवून सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या मनात तीर्थक्षेत्रांविषयी नकारात्मक भावना निर्माण केली. त्याचे फळ म्हणजे हल्लीची हिंदूंची कमालीची दुरवस्था ! – (प.पू.) डॉ. आठवले

केवळ साधकांच्या सेवावृत्तीमुळे आणि हितचिंतकांमुळे सनातन संस्थेचे अन् हिंदू जनजागृती समितीचे कार्य चालते, हे लक्षात घ्या !

बर्‍याच जणांना वाटते सनातन संस्थेचे आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रतिमास लाखो रूपये लागतील, एवढे कार्य होते कसे ? कार्य होण्यात काहीच गुपित नाही. सनातन संस्थेचे हजारो साधक सेवा म्हणून कार्य करतात. त्यातले काही जण आधुनिक वैद्य, वकील, अभियंता, संगणकतज्ञ इत्यादी आहेत. व्यवहारात असतांना त्यांना हल्लीच्या १ लाख रूपयांहूनही अधिक मासिक मिळकत होती. आता तेही सर्व … Read more

तथाकथित पुरोगाम्यांनो, देवावरील विश्‍वास, कुटुंबव्यवस्था आणि संत यांच्यामुळेच समाज टिकून आहे, हे लक्षात घ्या !

भारतात भयानक परिस्थिती असूनही पाश्‍चात्त्यांच्या तुलनेने मानसिक तणाव आणि मानसिक विकृती यांचे प्रमाण फार अल्प का आहे ? भारतात इतर देशांप्रमाणे यादवी होऊन राजसत्ता उलथून का टाकली जात नाही ? ३. हिंदूंच्या देवावरील विश्‍वासामुळे हिंदूंना धनदांडग्यांचा हेवा वाटण्याचे प्रमाण न्यून असणे : हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते धर्माचरण करत नसले, तरी मध्यमवर्गियांचा आणि विशेषतः खेडेगावातल्या बहुसंख्य … Read more

कालप्रवाहानुसार हिंदु राष्ट्राच्या अवस्था

मायेतील प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय असतो. हिंदु राष्ट्राच्या संदर्भात ते चित्र येथे दिल्याप्रमाणे असेल. वर्षे अवस्था ख्रिस्ताब्द वर्षे प्रधान गुण पहिली ३०० वर्षे उत्पत्ती २०२३ ते २३२२ सत्त्व पुढची ३०० वर्षे स्थिती २३२३ ते २६२२ सत्त्व-रज शेवटची ४०० वर्षे लय २६२३ ते ३०२२ रज-सत्त्व १००० वर्षांनंतर पुन्हा कलियुगांतर्गत कलियुगाचा आरंभ होईल. कालचक्र असेच … Read more

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि इतर संस्थांतील कार्यकर्ते यांच्यातील भेद

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी प्रयत्नरत असतात; म्हणून त्यांना इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणत्याही पदाची अपेक्षा नसते. – डॉ. आठवले

शाळेतच प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करायला शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती !

कोणालाच त्याचे काम, व्यवसाय साधना म्हणून करायला न शिकवल्याने कामगारांपासून आधुनिक वैद्य (डॉक्टर), वकील इत्यादींपर्यंत सर्वच अधिक पैसे कसे मिळवता येतील ?, याचाच विचार करतात. साधना म्हणून प्रत्येक गोष्ट करायला शाळेतच शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती. – (प.पू.) डॉ. आठवले