हिंदु धर्माप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रगती जलद होण्याचे एक कारण

प्रत्येकाचा धनप्राप्तीचा मार्ग निरनिराळा असतो, तसा ईश्‍वरप्राप्तीचा मार्गही निरनिराळा असतो. हे वैशिष्ट्य फक्त हिंदु धर्मातच आहे; म्हणून हिंदु धर्माप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रगती जलद होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विसरून हिंदू म्हणून एक व्हा !

१. हिंदूंच्या सर्वसमावेशक ऐक्याची आवश्यकता : भारतात आज हिंदू बहुसंख्य आहेत; पण हिंदूंचे हे सामर्थ्य जात, पक्ष, संप्रदाय, प्रांत, भाषा आदी विविध घटकांमध्ये विभागले गेले आहे. हिंदूंच्या संघशक्तीच्या र्‍हासामुळेच अन्य धर्मीय अल्पसंख्यांक असूनही हिंदु धर्म आणि समाज यांवर विविध प्रकारे (उदा. लव्ह जिहाद, धार्मिक दंगली, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, धर्मांतर आदी) अत्याचार करतात, तसेच शासनाकडूनही हिंदूंना दुय्यम … Read more

कुठे जातीवरून आरक्षण मागतांना केवळ स्वतःचाच स्वार्थ साधू इच्छिणारे, तर कुठे आत्मकल्याणासाठी (ईश्‍वरप्राप्तीसाठी) सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणारा हिंदु धर्म !

१. जातीवरून आरक्षण मागणारे : हे केवळ स्वतःचाच विचार करणारे, स्वार्थी असतात. ते केवळ स्वतःच्या जातीचा विचार करतात. समाजातील इतर जाती आणि राष्ट्र अन् धर्म यांचे त्यांना सोयर-सुतक नसते. त्यामुळे साहजिकच ते ईश्‍वरापासून दूर असतात. २. आत्मकल्याणासाठी (ईश्‍वरप्राप्तीसाठी) सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणारा हिंदु धर्म : दुर्योधन हा कौरवकुळाच्या विनाशाला कारण ठरणार आहे, हे ऋषीमुनींना ठाऊक … Read more

हिंदूद्रोह्यांनो, सत्यमेव जयते हे लक्षात ठेवा !

असत्याच्या पायावर कोणताही अन्याय, अविवेक अथवा काहीही टिकू शकत नाही. भलेही त्यामागे सत्ता, संपत्तीचे बळ असो ! काळ हाच सत्याचा संस्थापक आहे आणि असत्याचा विनाशक आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २०१५)

पर्यटकांना आकृष्ट करणारे अध्यात्मशास्त्र भारतात असतांना त्याचा लाभ न घेता केवळ मौजमजेच्या जाहिराती करणारी सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे देशाला अत्यंत हानीकारक !

पर्यटकांनी आकृष्ट व्हावे; म्हणून सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे जाहिरातींवर प्रतीवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. वर्ष २०१६ मध्ये केवळ केरळ राज्य ८० कोटी रुपये खर्च करणार आहे ! पाश्‍चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण करणार्‍या सरकारांनी भारतात आदर्श पर्यटन आयोजित करावे, हे अपेक्षित नाही ! अध्यात्म लाखो जणांना शेकडो वर्षे भारताकडे खेचत आहे. हा केवळ इतिहासच नाही, तर … Read more

सरकार कोणत्याही पक्षाचे असले, तरी देवस्थान समिती भक्तांचीच हवी !

शासन करणारा पक्ष पालटला की, शासकीय समित्यांवरील पराभूत पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या जागी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती केली जाते. या शासकीय समित्यांमध्ये काही सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या विश्‍वस्त समित्यांचाही समावेश असतो. सत्ताधारी पक्ष पालटतो तसे देवस्थान समित्यांचे पदाधिकारी पालटत असल्यामुळे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी सरकारीकरण झालेल्या मंदिरांचेही राजकारण आरंभले आहे, हे स्पष्ट होते. कोणत्याही देवस्थानाचा कारभार हा राजकारण विरहित असावा, … Read more

पक्षीय धाकामुळे जनतेच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरण्यास कचरणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार !

विरोधी पक्षातील आमदार जनतेच्या प्रश्‍नांवर हिरीरीने रस्त्यावर उतरलेले पहायला मिळतात; मात्र हेच आमदार सत्तेत आल्यानंतर जनतेच्या प्रश्‍नांसाठी आंदोलने करतांना आढळत नाहीत. एखादी समस्या गंभीर असेल, तर तुमच्या आंदोलनाला मी मागून सर्व सहकार्य करीन; पण मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे आंदोलनात कुठे दिसणार नाही, असे सांगतात. वास्तविक ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे ते रस्त्यावर उतरल्यास मनाच्या … Read more

अत्यंत दयनीय झालेली हिंदूंची स्थिती !

धर्मशिक्षणाच्या अभावी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी निर्माण केलेल्या विकल्पांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ज्ञात नसल्यामुळे त्यांना धर्माभिमान नाही; म्हणून त्यांची स्थिती जगातील सर्वधर्मियांत अत्यंत दयनीय झाली आहे ! देशाची सर्वच क्षेत्रांत अतिशय वेगाने होणारी अधोगती रोखली नाही, तर देशाबरोबर सर्व हिंदूही रसातळाला जातील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म !

धर्म एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतर सर्व पंथ आहेत. हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांचा, क्रूरतेचा, बलात्कारांचा, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या हजारो नोंदी आहेत. फक्त अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही. – (प.पू.) डॉ. आठवले

शंकराचार्य आणि संत यांचे कार्य

विविध पिठांचे शंकराचार्य ज्ञानमार्गी असतात, तर संत भक्तीमार्गी असतात. भक्तीमार्ग सुलभ असल्यामुळे भक्तीमार्गी संतांकडे हजारो मार्गदर्शनासाठी येतात, तर ज्ञानमार्ग कठीण असल्यामुळे शंकराचार्यांकडे थोडेच जण जातात. असे जरी असले, तरी धर्मासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास ते शंकराचार्य त्यांच्या ज्ञानामुळे सोडवू शकतात. – (प. पू.) डॉ. आठवले