पूर्वी राजे, महाराजे होते. त्यांचे वागणे अहंयुक्त असायचे. आता अध्यात्मातील…

पूर्वी राजे, महाराजे होते. त्यांचे वागणे अहंयुक्त असायचे. आता अध्यात्मातील बरेच महाराज राजे-महाराजे यांच्याप्रमाणे वागतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बहुतेक महाराज पंडित किंवा प्रवचनकार असतात ! त्यांचे अध्यात्म विषयक…

बहुतेक महाराज पंडित किंवा प्रवचनकार असतात ! त्यांचे अध्यात्म विषयक ज्ञान वरवरचे असते आणि त्यांची विशेष साधना नसल्याने त्यांचा आध्यात्मिक स्तर ५० टक्के एवढाच असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

काही संप्रदायवाल्यांची नियतकालिके आणि सनातन प्रभात

काही संप्रदायवाले आपल्या संप्रदायाचे महत्त्व इतरांवर बिंबावे; म्हणून त्यांच्या नियतकालिकांत काही जणांना आलेल्या शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील सकामातील चांगल्या अनुभूती छापतात; पण हजारोंना अनुभूती आल्या नसल्याचे छापत नाहीत. त्यामुळे यांच्याकडे गेलो, तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील, असे बर्‍याच जणांना वाटते आणि ते त्या संप्रदायात जातात. त्यांतील बहुतेकांना अनुभूती न आल्याने त्यांचा केवळ त्या संप्रदायावरीलच … Read more

हिंदूंना ‘धर्म’ शिकवण्याची आवश्यकता !

मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्‍यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

राष्ट्रप्रेमींनो आणि धर्मप्रेमींनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन भावपूर्ण सेवा केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

बहुतेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी एखादा प्रसंग आला, तरच कार्य करतात, उदा. गोरक्षा करणारे गायी कत्तलखान्यात जात असल्याचे कळले, तरच कार्यरत होतात. अयोध्येत राममंदिर, गंगाप्रदूषण इत्यादींच्या संदर्भात कार्य करणारे कधीतरी कार्य करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य करायचे असेल, तर असे कार्य करून चालणार नाही. चाकरी करणार्‍यांनी प्रतिदिन ३ – ४ घंटे तरी कार्य करायला हवे. … Read more

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांनाच विचारूनच कार्य करा !

आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्य करण्याच्या वेळी राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून तशी कृती केली पाहिजे. असे केले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणार्‍या आणि चुकीची शिकवण देणार्‍या धर्मद्रोह्यांनो, हे लक्षात घ्या !

योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणारे ऋषीमुनींपेक्षा स्वतःला शहाणे समजतात का ? योगासने केवळ शारीरिक व्यायाम नसून आध्यात्मिक व्यायाम आहेत. मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या धर्मद्रोह्यांचे कार्य आणि नाव काही वर्षांतच कोणाच्या लक्षात रहात नाही. याउलट ऋषींनी सांगितलेले अनंत काळापर्यंत अस्तित्वात रहाते; कारण त्यांच्यामध्ये ॐ ची निर्गुणाची शक्ती आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक…

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या संघटनांचा प्रसार त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा भारत येथेच होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले