श्रेष्ठ कोण संत चोखामेळा कि विद्रोही ?

संत चोखामेळा यांना विठोबाच्या दर्शनासाठी देवळात जाऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी विद्रोहींसारखा हट्ट केला नाही. त्यांच्या भक्तीमुळे विठोबाने त्यांना स्वतःच्या गळ्यातला हार दिला. श्रेष्ठ कोण संत चाेखामेळा कि विद्रोही ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्राभिमान

आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोमाता

आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. हा कृतघ्नपणाचा कळस होय ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताची कल्पनातीत भयानक अशी वस्तूस्थिती !

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशात ५००० चपराशांच्या नोकर्‍यांसाठी २३ लक्ष अर्ज आले होते. अर्ज करणार्‍यांपैकी काही जण विद्यावाचस्पती (डॉक्टरेट केलेले) होते ! – अज्ञात ————————————————————————————————————— लोकशाहीने दिलेल्या या वस्तूस्थितीवर मात करण्याचा एकमेव उपाय, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे आधुनिक न्यायप्रणाली, तर कुठे अध्यात्मशास्त्र !

अध्यात्मात वय पाहिले जात नाही, तर वृत्ती, कृती पाहिली जाते; म्हणून लहान वयांच्या संतांच्याही सर्वजण पाया पडतात. याउलट आधुनिक विचारसरणीची न्यायप्रणाली केवळ वय पहाते; म्हणून गुन्हेगारी करायची बुद्धी असलेल्यालाही बालच समजते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रचारात साहाय्य करणे आणि स्वतः प्रचार करणे

मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यापेक्षा स्वतः प्रचार करणे, ही वरच्या स्तराची साधना आहे. याचे कारण हे की, मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यात एक प्रकारे अहं असतो आणि प्रचारात काही चुका झाल्या, तर स्वतःकडे त्यांचे उत्तरदायीत्व नसते. याउलट स्वतः प्रचार करणे यात स्वतःवर असलेल्या उत्तरदायीत्वाची जाणीव असते. त्यामुळे प्रगती जलद होते. – (परात्पर गुरु) … Read more

एखाद्या व्यक्तीसाठी, व्यष्टीसाठी प्राणांचा त्याग करण्यापेक्षा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी,…

एखाद्या व्यक्तीसाठी, व्यष्टीसाठी प्राणांचा त्याग करण्यापेक्षा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी, म्हणजे समष्टीसाठी प्राणांचा त्याग करणे अधिक महत्त्वाचे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाश्‍चात्त्य आणि हिंदु संस्कृती यांतील भेद !

पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांच्याप्रमाणे सनातन संस्था आणि हिंदु…

राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांच्याप्रमाणे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये पद नसून पद त्यागणारे, सेवकभावात असणारे सेवा करतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकीय पक्षांतील व्यक्तींचे ध्येय असते सत्ताप्राप्ती, तर सनातनच्या साधकांचे ध्येय…

राजकीय पक्षांतील व्यक्तींचे ध्येय असते सत्ताप्राप्ती, तर सनातनच्या साधकांचे ध्येय असते ईश्‍वरप्राप्ती आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे ध्येय असते हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले