हिंदूंनो, १००० वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी क्षात्रवृत्ती निर्माण करा !…

हिंदूंनो, १००० वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी क्षात्रवृत्ती निर्माण करा ! : भारतातील हिंदूंमधील क्षात्रवृत्तीच्या अभावामुळे त्यांनी सुमारे १००० वर्षे पारतंत्र्य भोगले. प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर देशद्रोही अन् धर्मद्रोही राजकीय पक्ष यांच्या पारतंत्र्यात राहिलेल्या हिंदूंना आता केवळ धर्मशिक्षण आणि धर्मक्रांतीच वाचवू शकेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा…

जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा म्हणता येईल. त्याचप्रमाणे राष्ट्र आणि धर्म मृत्यूशय्येवर असतांना तशा जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणे, याला महामूर्खपणा म्हणता येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधे औषध कोणते घ्यायचे, हे बहुमताने ठरवत नाहीत; मात्र राज्य…

साधे औषध कोणते घ्यायचे, हे बहुमताने ठरवत नाहीत; मात्र राज्य कोणत्या पक्षाने करावे, हे बहुमताने ठरवतात. यापेक्षा हास्यास्पद जगात काय असेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्या संजीवन समाधीच्या वेळी लोकशाही…

संत ज्ञानेश्‍वर आणि त्यांची भावंडे यांच्या संजीवन समाधीच्या वेळी लोकशाही नव्हती, हे बरे होते, नाहीतर सर्व पक्षांनी एकमताने त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असता ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत,…

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास त्यांना दिशा मिळावी, यांसाठी असतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्म आणि भारत यांची काहीच माहिती नसलेले धर्मद्रोही आणि…

हिंदु धर्म आणि भारत यांची काहीच माहिती नसलेले धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही होतात, तर त्यांच्या संदर्भात माहिती असलेले त्यांच्यापुढे नतमस्तक होतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल….

हिंदूंनो, राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला नोकरी मिळावी, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात रहायला जन्म हिंदू नाही, तर व्यष्टी साधना करणारे…

हिंदु राष्ट्रात रहायला जन्म हिंदू नाही, तर व्यष्टी साधना करणारे किंवा समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात समष्टी साधना करणारे लायक असतील. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुंड धमकावून आणि राजकारणी भ्रष्टाचार करून पैसे लुबाडतात, तर संतांना…

गुंड धमकावून आणि राजकारणी भ्रष्टाचार करून पैसे लुबाडतात, तर संतांना धार्मिक वृत्तीचे लोक स्वतःहून अर्पण देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आधुनिक वैद्य, अभियंता, अधिवक्ता इत्यादींचे धर्माविषयी विचार काहीही असोत त्यांच्या…

आधुनिक वैद्य, अभियंता, अधिवक्ता इत्यादींचे धर्माविषयी विचार काहीही असोत त्यांच्या कार्यावर विचारांचा परिणाम होत नाही; पण पोलीस आणि न्यायाधिश यांच्या धर्माविषयीच्या व्यक्तीगत दृष्टीकोनामुळे, उदा. पोलीस आणि न्यायाधिश बुद्धीप्रामाण्यवादी असल्यास त्यांच्या कार्यावर परिणाम होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले