हिंदु धर्माची किंमत नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात. त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू आणि साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माची किंमत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)

कधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि…

कधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि त्यासाठी हिंदूंच्या एकजुटीची अतिशय आवश्यकता असतांना, जातीनुसार आरक्षण देणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही राज्यकर्ते अन् राजकारणी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०१६)

अनुभवातून शहाणे न होणार्‍या भारतातील हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, यात काय आश्‍चर्य !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. एका निवडणुकीत एखाद्या पक्षाला हिंदूंनी मत दिल्यामुळे तो निवडून आला, तरी देशाची स्थिती सुधारली नाही. हे लक्षात आल्यावर पुढच्या निवडणुकीत दुसर्‍या पक्षाला हिंदू मोठ्या आशेने निवडून आणतात. पुन्हा त्यांना आधीचाच अनुभव येतो. त्यामुळे ते पुढच्या निवडणुकीत पुन्हा पहिल्या पक्षाला मोठ्या आशेने निवडून आणतात. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७० वर्षांत असे अनेकदा होऊनही … Read more

राष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा !

साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य अन् ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, तसेच राष्ट्र आणि विश्‍व यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही ! धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग … Read more

सुसंघटित आणि सामर्थ्यशाली रहा हे महर्षि महायोगी अरविंद घोष यांचे बोधवाक्य आपल्याला सदैव अन् सतत ध्यानात ठेवणे अत्यावश्यक !

महर्षि अरविंद यांचे हे मत आपल्या समस्त हिंदु बांधवांनी मनावर घेतले असते, तर आज आमच्या या भारताला सर्वच बाजूंनी छळणारा जिहादी आतंकवाद आणि त्यांचा हिंसाचार यांची भीषण समस्या उद्भवलीच नसती. सुसंघटित आणि सामर्थ्यशील अशा हिंदु समाजाला आघात पोहोचवण्यास्तव या जिहाद्यांना दहादा विचार करावा लागला असता.

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

पिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत … Read more

नीतीशून्य आणि संस्कृतीद्रोही दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपट !

सध्याच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवरील बर्‍याच कार्यक्रमांत, तसेच चित्रपटांतही कौटुंबिक कलह, एकमेकांविषयी ईर्षा आणि सूडभावना, स्वतःची पत्नी असतांनाही परस्त्रीसह प्रेमसंबंध इत्यादी दाखवले जाते. अशा नीतीशून्य, अविवेकी आणि संस्कृतीद्रोही कार्यक्रमांचा परिणाम मोठ्यांसह लहानांवरही होतो. याला कारणीभूत असणार्‍या दूरचित्रवाहिन्या, चित्रपट-निर्माते आदींसह घराघरांत असे कार्यक्रम पहाणारे आणि लहानांनाही ते पाहू देणारे स्वतःच्याच हाताने स्वतःचे पाप वाढवत असून राष्ट्रालाही अधःपतित करत … Read more

मोहक विषवेली एक दिवस सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय, असे भय निर्माण झाले असणे

सनातन हिंदु धर्म संस्कृतीच्या अत्यंत जुनाट सनातन वृक्षाला ही विषवेली बिलगली असून; ती इतकी वाढली आहे की, तो वृक्षच आता दिसेनासा झाला आहे. ती मोहक विषवेली आता एक दिवस तो सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय ?, असे भय निर्माण झाले आहे. हिंदु जीवन ही चीज हिंदूनाच दुर्मिळ झाली आहे. हिंदुत्वाची बात दूरची ! आणि … Read more

मक्सम्यूलरने हिंदु धर्माचे मूळ असलेल्या वेदांनाच उखडून टाकणे

ऋग्वेदाच्या अनुवादाविषयी मॅक्सम्यूलर हा पाश्‍चिमात्त्य विचारवंत आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, वेद हेच हिंदूंच्या धर्माचे मूळ आहे. … आणि तेच कसे हीन आहेत ?, हे मी दाखवतो आहे. माझी खात्री आहे की, तीन सहस्त्र वर्षांपासून जे जे या वेदापासून मोहरले आहे, त्या सर्वांचे मूळच मी उखडून टाकले आहे.

हिंदुस्थानातच राहिलेला हिंदु अंतःकरणाने मात्र गोरा साहेब झालेला असणे

आज भारतियांच्या घराघरातील तेजस्वी शिक्षणाचे, संस्काराचे निर्मळ निर्झर आटून कोरडे ठणठणीत झाले आहेत. हिंदुस्थानात, हिंदु घराण्यात, हिंदु म्हणून जन्मला, हिंदु म्हणून वाढला, हिंदुस्थानातच राहिला असला, तरी आज अंतःकरणाने तो हिंदु, गोरा साहेब झाला आहे.