स्वामी विवेकानंदांची शिकवण
सर्व जगाच्या कल्याणासाठी दीपस्तंभ असलेल्या हिंदु धर्माचे तेज संपूर्ण विश्वात प्रस्थापित केल्याविना शांत बसू नका !
सर्व जगाच्या कल्याणासाठी दीपस्तंभ असलेल्या हिंदु धर्माचे तेज संपूर्ण विश्वात प्रस्थापित केल्याविना शांत बसू नका !
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठीचा संदेश ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना माझा नमस्कार ! सध्या देश आणि काल संक्रमण अवस्थेतून जात आहे. या प्रतिकूल काळात आपल्याला हिंदु राष्ट्र-स्थापनेचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य करायचे आहे. आपल्या साहाय्याला अत्यल्प धर्मनिष्ठ सहकारी आहेत, तर धर्मशत्रू आणि त्याचे समर्थक सहस्रोंच्या पटींनी आहेत. शत्रूंची अधिक संख्या आणि प्रतिकूल काळ … Read more
‘अथर्ववेद कांड ७, सूक्त ९२, ऋचा १ मध्ये म्हटले आहे, ‘राष्ट्राचे रक्षण करणारा, राष्ट्र समर्थ करणारा, राष्ट्राला साधन संपन्न करणारा, गुप्त रूपाने साम-दाम-दंड-भेद उपायांद्वारे दुष्ट शक्तींचे निर्मूलन करणारा, अशा प्रकारे उत्तम शासन करणारा, गुणवान, ‘सर्वांना सुख मिळावे’, असा मनापासून विचार करून राज्य करणारा राजा असावा.’
‘अथर्ववेद कांड ७, सूक्त ९३, ऋचा १ मध्ये म्हटले आहे, ‘उपद्रव करणार्या शत्रूंचा विनाश करून जनतेला शांती प्रदान करणारा राजा असावा.’
धर्मग्लानी दूर करण्यासाठी अवतारी पुरुष जन्म घेतात. ते दृष्टांचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करतात. तेव्हा ते मायेतील संबंध बाजूला ठेवतात. जसे मामा असूनही कृष्णाने कंसाचा वध केला. कौरव-पांडव भाऊ असूनही कौरवांच्या दृष्ट वृत्तीमुळे पांडवांनी त्यांचा नाश केला. अगम्य कर्तृत्व त्या वेळी भारतात सर्वत्र मुसलमानी राज्य असूनही अगम्य क्षात्रतेज युक्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील पाच … Read more
‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य आहे. जर राजदंडाने ते कार्य पार पाडले नाही, तर समाजात मात्स्य न्याय (मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो.) माजेल.’
‘अफझलखानरूपी नराधमाला वधण्यासाठी जशी तू शिवछत्रपतींच्या तलवारीचे तेज बनलीस, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, धर्मांधता, जात्यंधता, गोहत्या आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात संघटित होण्यासाठी आम्हालाही तेज दे ! हिंदु धर्माची कीर्ती जगभर पसरवण्यासाठी जशी तू स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी राहिलीस, तसे हिंदु धर्म आणि साधना यांचा जगद्व्यापी प्रचार करण्यासाठी आमचीही स्वामिनी बन !! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बालवयातच देशाच्या … Read more
‘हे सर्व पहातांना वाटते की, जसे श्रीकृष्णाने पुतना आणि श्रीरामाने शूर्पणखा राक्षसींची खरी रूपे, म्हणजे मायावी रूपे उघड केली, तसे परात्पर गुरु डॉ. आठवले हे सध्याच्या निधर्मी राजवट असलेल्या लोकशाहीतील अयोग्य कारभार उघड करत आहेत. ही हिंदु राष्ट्र येण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची लक्षणे आहेत.’
आपल्या हिंदु धर्मात धर्माचरणासाठी सण आणि व्रत-वैकल्ये करण्यास सांगितलेली आहेत. त्यामुळे मनाची एकाग्रता होते आणि योग्य धारणा निर्माण होते. त्यामुळे मानवाला पाप-पुण्याची चाड निर्माण होत असल्याने त्याच्या हातून पापाचरण होत नाही आणि म्हणूनच त्याला सत्य दर्शन होते.
‘आज पाश्चात्त्य लोक लढाई न करता, आपल्या विचारांचा पगडा दुसर्या देशांवर लादत आहेत. दूरदर्शनच्या माध्यमाद्वारे विकारी आणि विलासी, क्रूरता वाढविणारे, हिंसक अन् अराजकता माजवणारे विचार पसरवत आहेत. दैवी विचारांचा लोप होत आहे. ते दुष्ट लोक स्वतः समृद्ध होण्यासाठी अणु बॉम्ब इत्यादी प्रलयकारी शस्त्रे बाळगून, दुसर्यांना शांतीच्या नावावर शस्त्रे बाळगण्यापासून परावृत्त करत आहेत. हिडीस नृत्य, बेसूर … Read more