वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

‘आपली वैदिक संस्कृती अत्यंत महान आहे. संस्कृती सोडणे म्हणजे हाताला लागलेला धनसंपत्तीचा साठा सोडण्यासारखेच आहे. वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल. वैदिक आर्य संस्कृती ही परमेश्‍वराकडून आलेली अनादी, अच्युत आणि अतिशुद्ध असून ती अनादि मानवी संस्कृतीपासून चालत आली आहे.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ … Read more

हिंदु संस्कृती

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

उदासीनता घालवून कार्यप्रवृत्त करणारा आणि राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक संदेश !

‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही. सांप्रत आपणा सर्वांना आपाद्मस्तक राजसभाव अंगी बाणलेला आदर्श नेता हवा आहे, ज्याच्या नसानसांमधून प्रचंड चैतन्य ओसंडत आहे. असा युवक नेता हवा आहे, ज्याच्या अंगी रणांगणावरील योद्ध्याचा आदेश भरून राहिला आहे. आयुष्याच्या रणभूमीवर सध्या आपणांस लढाऊ, शूर … Read more

देव सर्वत्र आहे

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’

विजयादशमीनिमित्त संदेश

विजयादशमीपासून हिंदु समाज आणि देशहित यांच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करा ! ‘वर्ष २०२१ ते २०२३ हा जागतिक महायुद्धाचा काळ असणार आहे. या काळात भारतीय सैन्यालाही सीमोल्लंघन करावे लागणार आहे. भारतीय सीमेवर युद्ध चालू झाल्यानंतर शत्रूराष्ट्रांचे हस्तक असणारे देशांतर्गत शत्रू अराजकता निर्माण करण्यासाठी गृहयुद्ध भडकवू शकतात. तसेच देशाच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या या काळात पूर, भूकंप, युद्ध इत्यादींमुळे … Read more

धर्मप्रेमींनो, आपत्काळाच्या दृष्टीने कौशल्यविकास करा !

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत आपण कौशल्यविकास करत होतो. आता काळानुसार आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने विशेषतः हिंदूंच्या रक्षणाच्या दृष्टीने कौशल्यविकास करावा लागेल. सध्याचा काळ हा आपत्काळ म्हणजे संकटकाळ आहे आणि सहा मासांनी येणारा काळ हा प्रत्यक्ष युद्धकाळ आहे. अशा संकटकाळात देशभक्त आणि सत्त्वगुणी हिंदूंचे संरक्षण, तसेच भारताचे संरक्षण हेच धर्मरक्षणाचे कार्य ठरणार … Read more

राजकीय पक्षाचे खरे रूप 

‘सर्व राजकीय पक्ष जनतेला स्वार्थी मागण्या करायला शिकवतात, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी त्याग करायला शिकवत नाहीत.’

‘संस्कृती टिकवा !’

सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट असून तरुण मुले-मुली हिंदु संस्कृतीचा र्‍हास करत असल्याचे दिसणे ‘सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट आहे. तरुण मुले-मुली आपल्या हिंदु संस्कृतीचा र्‍हास करतांना दिसत आहेत. मुला-मुलींचे कपडे, त्यांची केशरचना आणि मुलींच्या कपाळावर कुंकू नसणे हे सर्व पाहिल्यावर अयोग्य वाटते, एकूणच तरुणांचे राहणीमान, वागणे-बोलणे इत्यादी सर्वच गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. साम्यवाद आणि … Read more

सध्याच्या कलियुगात चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही असणे

सध्या भारतात लोकशाहीच्या नावाखाली लुटारूंचा धंदा चालू आहे. चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही चालू आहे. काही टक्के लोकांची मते मिळाली की, ते राज्य करतात, उदा. ३० टक्के लोक ७० टक्के लोकांवर राज्य करतात. लोकही तसेच आहेत. पर्याय नसल्याने लोकांना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधींना केवळ मत द्यायचे; म्हणून मत दिले जाते. आज जरी नकारात्मक मतदानपद्धत … Read more