निवडणूक लढवण्याचे खरे कारण !

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कोणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान आणि पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी जनताच भारताच्या -हासास कारणीभूत !

‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी ! एका अर्थाने भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी भारतीय जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तिस-या महायुद्धात देव कोणाला वाचवणार ?

‘जे हिंदु राष्ट्रात रहाण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांना आगामी तिसर्‍या महायुद्धात देवच वाचवणार आहे. त्यांची काळजी करू नका !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.८.२०२१)

राजकारणी आणि राष्ट्रप्रेमी यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांच्या सर्व कार्यांमागे एकमेव उद्देश असतो, ‘पुढच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येणे’, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा उद्देश असतो, ‘राष्ट्र आणि धर्म यांना सुस्थितीत आणणे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे सिद्ध करणारे व्यवहारातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत आणि पाकिस्तान !

‘भारत पाकिस्तानपेक्षा आकाराने अनेक पटींनी आणि लोकसंख्येने मोठा असूनही भारताला छोटा पाकिस्तान गेली ७४ वर्षे भारी ठरत आहे. याचे कारण म्हणजे तेथील नागरिकांची कुराण आणि अल्ला यांच्यावरील श्रद्धा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सध्याच्या काळात मतदान करण्यासाठी चांगले उमेदवार मिळणे कठीण झाले आहे !

‘मतदानात हिंदू जो पैसे देतो, त्याला किंवा दोन उमेदवारांतील कमी वाईट असेल (Lesser of the two evils), त्याला मत देतात; कारण बहुदा चांगले उमेदवार कुठे नसतातच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे पाश्चात्त्य विचारसरणी, तर कुठे हिंदु धर्म !

‘पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे. याउलट हिंदु धर्म ईश्‍वरप्राप्तीसाठी, म्हणजे चिरंतन आनंदप्राप्तीसाठी मार्गदर्शन करतो; म्हणून हिंदु धर्माचे पालन करणारा कधीच दुःखी होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले