धर्माबरोबर शक्ती नसल्याने जगाचा नाश अटळ !

विज्ञानशास्त्र शक्तीशी संबंधित शास्त्र आहे, तर अध्यात्मशास्त्र हे शिवाशी संबंधित शास्त्र आहे. शक्ती शिवाच्या म्हणजे धर्माच्या (सत्याच्या) समवेत असेल, तरच कल्याणकारक होईल. शक्ती शिवाच्या समवेत गेली नाही, तर नाशक (विनाशकारी) होईल. सर्वत्र भगवान आहे, मग मल-मूत्र विसर्जन कसे करणार ? मनुष्याच्या शरिरात सहस्रो जीवाणू मल-मूत्र विसर्जन करतात, तरी तो अपवित्र होत नाही. परमेश्वराच्या शरिरातच सर्व … Read more

भगवत्कथा ऐकण्यास जाण्याचे लाभ

१. कर्मयोग : कथेसाठी जाणे आणि येणे २. भक्तीयोग : श्रद्धा वाढणे ३. ज्ञानयोग : कथेचा सारांश समजणे प्रवचनाचे वैशिष्ट्य : प्रवचनकार श्रम करतो आणि फळ श्रोत्यांना मिळते ! पुढच्या जन्मी देवाण-घेवाण फिटण्याचे उदाहरण एक मुलगा मूठ मूठ माती घेऊन एका सापावर टाकत होता. सापाने फणा खाली घातला. तितक्यात दुसऱ्या एका माणसाने सापाला मोठा दगड … Read more

बळी राजाची भक्ती

शुक्राचार्यांनी बळीला सांगितले, ‘हा वामन नाही, श्रीविष्णु आहे’. तेव्हा बळी राजा म्हणाला, ‘धन्य गुरुमहाराज’. गुरु त्यालाच म्हणतात, जो भगवंताचे दर्शन करवतो. देहाला मलीनता येण्याची कारणे १. नेत्र : परनारीला पहाणे. (उपाय : तिला पर नारी म्हणून नाही, तर देवी, आई किंवा बहीण म्हणून पहा.) २. कान : परनिंदा ऐकणे ३. जीभ : दुसऱ्यांचे दोष सांगणे … Read more

गोष्टीरूप अध्यात्म

सर्वजण कोणत्या ना कोणत्या चक्रात पडतात; पण जे चक्रधारीच्या (श्रीकृष्णाच्या) चक्रात पडतात, ते संसारचक्रातून वाचतात. हिंसेपोटी भीती : सिंह हत्तीला मारतो, तरीही तो वनात जातांना मला कोण मारणार तर नाही ना, या भीतीने मागे-पुढे पहात जातो. सिंहाला कोण मारणार ? पण सिंह हिंसा करत असल्याने त्याला भीती वाटते. ज्ञानाचा दिवा आणि संयमाचा आरोध (ब्रेक) नसेल, … Read more

आवश्यक त्या मार्गानुसार उन्नतांंनी साधना सांगणे

एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले ‘महाराज, मुक्ती मिळवण्यासाठी वनात जायला हवे का ?’ साधू म्हणाला, ‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनकराजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्याच वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. … Read more

दया

अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे दयाळू म्हणून प्रसिद्ध होते. एकदा मित्रासमवेत घोडागाडीतून जात असतांना मित्र त्यांच्यावर थोर असूनही केवढा दयाळू इत्यादी स्तुतीसुमने उधळीत होता. लिंकन मित्राला सांगत होते, “बाबा रे, मी सत्यच सांगतो की, मी काही दयाळू नाही”. जाता जाता एक घोडा तारेच्या कुंपणात अडकून रक्तबंबाळ झालेला दिसला. लगेच लिंकन गाडीतून उतरले आणि त्यांनी घोड्यास … Read more

दया म्हणजे दुसऱ्याच्या जीवनाचे मूल्य समजणे

आपल्या आतील परमात्म्याला पहाणे हे ज्ञान आहे. दुसऱ्यांमध्ये परमात्मा आहे हे न विसरणे, म्हणजे करुणा, दया. घराचा आश्रम किंवा आश्रमाचे घर होणे घरात राहूनही तुम्ही कोणाला उद्विग्न करत नसाल, तर तुमचे घर आश्रमच आहे. वाल्मीकींच्या आश्रमात जाऊनही तुमचे मन उद्विग्न होत असेल, तर तुम्ही वाल्मीकींना ओळखले नाही. – डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

पू. अप्पाकाका यांचे चिंतन !

निंदा-स्तुती दुसर्‍याचा स्वभाव आणि त्याची कर्मे यांची निंदा करू नये. जो सर्व भूतांमध्ये परमेश्‍वर पहातो, तो कोणाचीही निंदा करूच शकत नाही. जेथून आपल्याला अपाय, धोका होण्याचा संभव वाटतो, तेथे भगवत्भाव ठेवावा, म्हणजे अपाय, धोका घालवण्याचा तो उपाय होऊन जातो. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)