कठोर प्रयत्न केले, तरच साधनेत प्रगती होते !

कुंभाराला एखादे मातीचे भांडे बनवण्यासाठी प्रथम माती चाळावी लागते. माती एकसारखी कालवावी लागते. लहानसे भांडे बनवण्यासाठी एवढी प्रक्रिया करावी लागते. असे आहे तर देवाशी एकरूप होण्यासाठी साधनेचे कठोर प्रयत्न करावे लागणारच ना ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

प्रयत्नांना तळमळीची जोड दिल्यास आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होणार आहे !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले आहे, तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. भावजागृतीचे प्रयत्न, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन प्रक्रिया, तसेच सेवा करतांना तिला तळमळीची जोड दिली, तर आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होईल. – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती कशी मिळेल ?

प्रत्येक सेवा ‘साक्षात् भगवंताची पूजा करत आहे’, या भावाने केल्यास ईश्वराला अपेक्षित अशी सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती मिळेल ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

सत्संगाला वेळेत उपस्थित रहाण्याचे महत्त्व !

साधकांनो, सत्संगाच्या वेळी देवता, ऋषिमुनी आणि पुण्यात्मे यांचेही आगमन होत असल्याने सत्संगाला वेळेत उपस्थित रहा ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

साधना म्हणजेच आनंद !

‘साधना म्हणजेच आनंद ! साधनेतील आनंद अनुभवण्यासाठी त्या मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर चिकाटीने मात करतो, तो खरा साधक !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाणे हे सातत्याने आचरणात आणायला हवे !

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !

‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली अमूल्य शिकवण आपल्या अंतर्मनात खरोखरंच रुजली आहे का ?’, याचे मूल्यमापन करणेही सोयीचे जाते. … Read more

सर्वांमध्ये भगवंताचे रूप पाहून त्यांना नमस्कार करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

‘देवद आश्रमात एक हितचिंतक आले असतांना महाराजांनी त्यांना वाकून नमस्कार केला. एका साधिकेची भावस्थिती पाहून महाराजांनी त्यांनाही वाकून नमस्कार केला. ‘एका साधकाच्या घराच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला’, हे कळल्यावर महाराजांनी आनंदाने साधकाच्या पायाला हात लावून नमस्कार केला. ही सर्व उदाहरणे पाहिल्यावर ‘परात्पर गुरु पांडे महाराज वयोवृद्ध आणि तपोवृद्ध असूनही त्यांचा अहं किती अल्प आहे’, हे … Read more