निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आनंद आहे !
‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.९.२०२३)
‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.९.२०२३)
‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.१.२०२२)
१. ‘स्वतःची प्रगती व्हावी’, असे वाटत असेल, तर साधकाने पूर्ण अंतर्मुख झाले पाहिजे ! २. साधकाच्या मनावर परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार झाला की, त्याचा साधनेतील वेळ वाया जात नाही ! ३. साधना कृतज्ञतापूर्वक करायला हवी. सतत देवाला नमस्कार करून त्याच्या चरणी अक्षरशः लोळण घेतली की, तो मार्ग दाखवणारच ! ४. ‘भगवंताला क्षणोक्षणी मन अर्पण करणे’, … Read more
कोणतीही सेवा अशी करायची की, ‘ती देवाला आवडली पाहिजे’. सेवा झाल्यावर स्वत:ला एकच प्रश्न विचारायचा, ‘देवा, तुला ही सेवा आवडली का ?’ त्यावर आतून देव जसे उत्तर देईल, त्यानुसार पुढे कृती करत रहायचे. जेव्हा ‘मी केलेली सेवा देवाला आवडायला हवी’, असा विचार असतो, तेव्हा आपल्याकडून ‘आळस करणे, सवलत घेणे’, असे होत नाही. दिलेली सेवा मनापासून, … Read more
मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी गुरुदेवांनी आपल्याला त्यांच्या दिव्य चरणांशी आणले आहे. प्रत्येक साधकामध्ये अशी तळमळ हवी की, गुरुदेवांनी माझ्यासाठी एवढे केले आहे, तर मी गुरुचरणी किती कृतज्ञता व्यक्त करू ? गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी मी स्वत:ला किती झोकून देऊ ? ‘प्रयत्न करायला हवेत’, असा केवळ विचार नको, तर ते प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणायला हवे. खरा … Read more
अ. गुरुकृपेने साधनेचे क्रियमाण वापरून प्रारब्धावरही मात करू शकतो ! : आपले गुरु एवढे महान आहेत की, ते प्रत्येक साधकाला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारच आहेत. ते प्रत्येकाला मोक्षाला घेऊन जाणारच आहेत. गुरूंवर अपार श्रद्धा ठेवून आपण साधनेचे क्रियमाण वापरूया. साधनेचे योग्य क्रियमाण वापरल्यास गुरुकृपेने आपण प्रारब्धावरही मात करू शकतो. आ. परिस्थिती अनुकूल कि प्रतिकूल हे … Read more
आपत्काळ वेगाने येत आहे. प.पू. गुरुदेव नेहमीच सांगतात, ‘‘पाणी नाकापर्यंत आले आहे. त्यानंतर संधीच मिळणार नाही.’’ यासाठी व्यष्टी साधना आताच वाढवली पाहिजे. आपल्याला केवळ माध्यम बनायचे आहे आणि बाकी सर्व गुरुच करून घेणार आहेत. माध्यम बनण्यासाठी मन आणि बुद्धी या सर्वांची शुद्धी झाली पाहिजे. साधनेचा स्तर वाढल्यावर आपण परेच्छेने वागायला लागतो. साधकांमध्ये क्षमता आहे; म्हणून … Read more
श्रीगुरूंनी आपल्याला भरभरून दिले आहे. त्यांच्याप्रती आपल्याला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते, यावर साधनेतील प्रयत्न अवलंबून असतात. साधनेत अल्पसंतुष्टता नको. ‘पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत’, याची जाणीव ठेवूया. ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, हाच गुरूंचा संकल्प आहे. सर्व साधक अध्यात्मात कधी पुढे पुढे जाण्याची गुरुदेव वाट पहात आहेत. आपण केलेले लहान लहान प्रयत्न पाहूनही गुरूंना आनंद होतो. ते … Read more
गुरुदेवांचा प्रत्येक श्वास हा साधकांसाठीच असतो. त्यांना प्रत्येक क्षणी साधक आणि साधकच डोळ्यांसमोर दिसतात. गुरूंचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक विचार हा त्यांच्या साधकांसाठीच असतो. ‘आज साधकांसाठी काय करू ?’, ‘समष्टीसाठी काय देऊ ?’, अशीच त्यांची तळमळ असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे आणि त्यांच्या प्रीतीमुळेच साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट होत आहेत. साधकांचे जीवन … Read more
आपण काही वेळा ‘अमुक एक केले नाही, तरी देवाच्या कृपेने काही अडचण आली नाही’, असे अनुभव सांगतो किंवा ऐकतो. त्या वेळी आपले क्रियमाण योग्य न वापरल्यामुळे देवाला तेथे अधिक शक्ती व्यय करावी लागलेली असते. असे होऊ नये म्हणून आपले १०० टक्के क्रियमाण वापरावे. – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ