अध्यात्माच्या मार्गाने जातांना दुस-यांना आनंद दिल्यावर साधनेत प्रगती होते ! 

‘आतापर्यंत जगत आलेले मायेतील आयुष्य संपवून, सर्वसंगपरित्याग करून अध्यात्माच्या मार्गाने जातांना सतत दुसर्‍यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच साधनेत प्रगती होते. दुसर्‍यांना आनंद देता देता आपल्याला गुरुकृपेने केव्हा ‘सत्-चित्-आनंदाची अनुभूती येऊ लागते’, ते कळतही नाही. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.४.२०२०)

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा साधकांच्या चपलांप्रतीचा उच्च भाव !

आपल्या साधकांच्या चपला म्हणजे ‘गुरुपादुका’च आहेत. ‘वस्तू काय आहे ? कुणाची आहे ?’, यापेक्षा त्या वस्तूप्रतीचा भाव महत्त्वाचा आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

खरी ‘देवपूजा’

‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

मनुष्यजन्मात साधना करण्याचे महत्त्व

‘अनेक जन्मांनंतर मनुष्यजन्म लाभतो आणि ‘अनेक जन्म केलेल्या साधनेचे फळ’ म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांसारखे ‘गुरु’ त्या मनुष्यजिवाच्या जीवनात येतात. मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात. जोपर्यंत आपण … Read more

‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ म्हणजे काय ?

अध्यात्मात जे शिकलो, ते लगेच कृतीत आणणे, हेच ‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ आहे ! ईश्वराप्रती असलेल्या भावानेच अध्यात्मशास्त्र जाणता येते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे. अध्यात्मात शिकू तेवढे अल्प आहे. शिकण्यासाठी अनेक जन्मही अपुरे पडतील. त्यामुळे अध्यात्माचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा त्यामधील तत्त्व ओळखून त्यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्म सुंदर आहे

अध्यात्म सुंदर आहे. ते जगणे आणि अनुभवणे, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेणे ! -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

देव मिळाल्यावर काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही

आयुष्याच्या या साधना प्रवासात जेथे देव मिळतो, तेथे अजून काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही. देवाचे विश्व पुष्कळ सुंदर आणि अद्भुत् आहे. त्यात रमले की, कशाचीच आठवण येत नाही. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

मनुष्यजन्माचा उद्देश !

मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून जिवाची मुक्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे जे काही भोग शेष राहिले असतील, तेही भोगून संपवावेत. देव जिवाला साधना करून मोक्षप्राप्ती करवून घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर मनुष्यजन्म देतो; पण मनुष्य हे विसरतो आणि मायेच्या मागे लागून संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतो.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ