तळमळीने साधना करून भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद असणे

‘आपण कधीही काही कमवत नाही आणि गमावतही नाही; कारण प्रत्येक कर्म करणारा कर्ता-करविता तर ईश्‍वरच आहे. मग कसले दुःख आहे ? त्या जगाच्या पालनकर्त्यावर सर्व सोडून द्या आणि निर्धास्त मनाने साधना करा आणि पहा तर खरं, तो आपल्यासाठी काय काय करतो ते ! भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद आहे. तळमळीने साधना करण्याचे दायित्व केवळ आपले … Read more

उच्च विचारांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा साठवलेली असते

उच्च विचारांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे आणि त्यांमुळे दैवी कार्य घडत असल्याने मनाला त्यांचे खाद्य देऊन ते निरोगी ठेवावे ! ‘आयुष्यात कधीही स्वतःला न्यून लेखू नका. कनिष्ठ विचार करू नका. नकारात्मकतेत जाऊ नका. त्याऐवजी उच्च आणि व्यापक विचारांनी मोठे व्हा. उच्च विचारांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा साठवलेली असते. ही ऊर्जा तुमच्या मनाला चांगले कार्य करण्यासाठी प्रभावित … Read more

साधना करण्याचे महत्त्व

जे आयुष्यभर राबून अशाश्वत अशा विज्ञानाने मिळत नाही, ते साधनेत सेवा करून क्षणात मिळू शकते. हाच साधनेतील आनंद आहे. – श्रीचित्‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ, कुंभकोणम, तमिळनाडू. (२२.१०.२०१९)

देवदर्शन आणि देवस्मरण यांमधील भेद !

देवदर्शनाला स्थुलाचे बंधन आहे; पण देवस्मरणाला त्याचे बंधन नाही. आपण असू, तिथे त्याला अनुभवता येऊ शकते. त्यासाठी आपली तेवढी श्रद्धा आणि तळमळ हवी. -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन म्हणजे ईश्वरी ऊर्जेचे दर्शन !

आपण एखाद्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन घेतो, तेव्हा ते केवळ त्या व्यक्तीचे दर्शन नसून त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी ऊर्जेचे दर्शन असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

ईश्वराचे खरे भक्त कधी होता येते ?

संतांचे मन ओळखून त्यांची सेवा करण्यासाठी उत्तम शिष्यासारखा भावच हवा, तरच ईश्वराचे खरे भक्त होता येते. -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

संत वर्तमानकाळात रहात असल्याने त्यांच्या मनाची शक्ती पूर्ण वापरली जाते

संतांना मागची आठवण नसते आणि त्यांच्या मनात पुढचा विचार येत नाही. संत वर्तमानकाळात रहात असल्याने त्यांच्या मनाची शक्ती पूर्ण वापरली जाते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

एखादी कृती करता न येणे, यामागची प्रमुख दोन कारणे

१. एकतर मुळातच त्या कृतीविषयी काही माहिती नसणे. २. ती न करण्यामागे अहं, आळशीपणा किंवा ती कृती करण्यास न आवडणे, यांसारखे स्वभावदोष आड येणे. उपाय – कृती करता न येण्यामागचे मूळ कारण शोधून त्यानुसार प्रयत्न करणे आणि ती कृती करतांना देवाला प्रार्थना करणे : साधकांनी ‘यांपैकी नक्की कोणते कारण आहे ?’, याचे चिंतन करावे आणि … Read more

आपले बोलणे कसे असावे ?

आपले बोलणे असे असावे की, जे दुसर्‍याला साधनेत प्रोत्साहन देऊन गुरुसेवेत पुढे नेईल ! प्रत्येकाचा आनंद शोधून त्याच्याच भाषेत साधनेला धरून त्याच्याशी बोलायला हवे. यालाच ‘प्रकृतीशी जुळवून घेणे’, असे म्हणतात. त्यामुळे समोरच्याशी पटकन जवळीक साधता येते आणि संबंधित कार्याची फलनिष्पत्तीही वाढते. ‘दुसर्‍याला काय सांगायचे आहे ?’, हे मनाशी ठरवून त्याला चूक जरी सांगायची असली, तरी … Read more

सर्व पृथ्वीलाच घर बनवा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सर्व पृथ्वीलाच घर बनवण्याचे ध्येय दिले आहे. आता सर्व विश्‍व हाच आमचा संसार आहे. गुरूंच्या कृपेने आता आम्हाला वेगळे घर आणि नातेवाईक राहिले नाहीत. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ