‘संस्कृती टिकवा !’

सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट असून तरुण मुले-मुली हिंदु संस्कृतीचा र्‍हास करत असल्याचे दिसणे ‘सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट आहे. तरुण मुले-मुली आपल्या हिंदु संस्कृतीचा र्‍हास करतांना दिसत आहेत. मुला-मुलींचे कपडे, त्यांची केशरचना आणि मुलींच्या कपाळावर कुंकू नसणे हे सर्व पाहिल्यावर अयोग्य वाटते, एकूणच तरुणांचे राहणीमान, वागणे-बोलणे इत्यादी सर्वच गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. साम्यवाद आणि … Read more

काळानुसार समष्टी साधनेचे महत्त्व !

‘काळाला अनुकूल अशी आपली साधना हवी. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना केवळ व्रते करण्यापेक्षा घरोघर जाऊन निद्रिस्त समाजाला साधना सांगून त्याला जागृत केले पाहिजे, म्हणजेच समष्टी साधना केली पाहिजे. समाजाला योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. सर्व समाजाचे उत्थापन म्हणजेच हिंदु राष्ट्राची निर्मिती !’

कर्माची फलनिष्पत्ती

‘कर्म कुठले करायचे ?’, ते आपल्या हातात असते. ‘त्याचे फळ केव्हा द्यायचे ?’, हे देवाच्या हातात असते.

अध्यात्मात वेडे व्हा !

अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’

आश्रमात रहाण्याचे महत्त्व

आश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्‍याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.

काळाला ईश्वर समजल्यास प्रारब्धावर सहजतेने मात करणे शक्य होत असणे

काळ हा आपल्याला अध्यात्म शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. तो आपल्यासाठी परिस्थिती, परिणाम, प्रारब्धामुळे येणार्‍या सुख-दुःखाच्या गोष्टी असे सर्व घेऊन येत असतो. काळाला ईश्‍वर समजून सामोरे गेले, तर जीवनातील नित्य घडणार्‍या गोष्टींचे काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रारब्धावर सहजतेने मात करता येते.

प्रायोगिक माहिती मिळणे आणि आनंदावस्था लवकर प्राप्त होणे

अध्यात्मातील कृतीचे महत्त्व सनातन संस्थेत सप्ताह, पारायणे होत नाहीत, तर साधनेत कृती करून पुढे जाण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन सत्संग आणि साधनेचा आढावा घेणे हे नित्यनियमाने होते. पारायणातून केवळ तात्त्विक माहिती मिळते; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून अहं लवकर अल्प झाल्याने देवाविषयीच्या अनुभूती लवकर येतात. केवळ पारायण न करता साधनेची प्रत्यक्ष कृती केल्यास ईश्‍वराविषयीची प्रायोगिक … Read more

विज्ञानातील प्रयोग चुकू शकतो; पण अध्यात्मातील कोणताही प्रयोग चुकत नाही अथवा निष्फळ ठरत नाही !

अध्यात्माचे श्रेष्ठत्व आणि विज्ञानाच्या मर्यादा कलियुगामधे अनेक लोक विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. ते सर्व प्रयोग यशस्वी होतातच, असे नाही. कित्येकदा विज्ञानातील प्रयोग चुकल्यामुळे त्यासाठी वापरलेले मनुष्यबळ, आर्थिक गुंतवणूक आणि वेळ अशी सर्व प्रकारची ऊर्जा प्रयोगाच्या अंती वाया जाते, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अध्यात्मात मात्र तसे होत नाही. साधकाने ईश्‍वराला संपूर्ण शरण जाऊन श्रद्धा … Read more

एखाद्या प्रसंगातील कार्यकारणभाव जाणून घेण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे !

बर्‍याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्‍लेषण आणि … Read more