श्रीकृष्णाचे सारथ्य

कृष्णाने गीतेच्या ११ व्या अध्यायात सांगितलेले आहे. ‘हे पहा, युद्ध झालेलेच आहे. फळ मिळालेले आहे.’ आरंभीच त्याने इतिश्री सांगून टाकली, तरीपण युद्ध करतांना आलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी तो सारथी झाला. आपल्याला योगेश्‍वराचा (प.पू. डॉक्टरांचा) आधार आहे. त्यामुळे आपल्याला भिण्याचे कारण नाही. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, हे सांगूनच टाकले आहे, तरीपण येणार्‍या काळासाठी तोंड देण्याला … Read more

गोवंश हत्या रोखण्याचा प्रभावी उपाय !

‘पूर्वी गोरक्षकांवर अत्याचार होत नव्हते, तर आता गोरक्षकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आता हिंदू पेटून उठतील. गोहत्या बंदी कायदा असूनही गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना आता मुभा मिळत आहे. जेव्हा हिंदू जागृत होतील, म्हणजे गोवंश हत्या करण्यासाठी देणार नाहीत, तेव्हा गोतस्कर हे गोतस्करी करू शकणार नाहीत.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

कुंभमेळे का होतात ?

‘आपल्याकडे कुंभमेळे का होतात ? मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या पवित्र नदीच्या पाण्यात महिनाभर साधुसंतांचे चैतन्य उतरावे आणि सर्वांना त्या चैतन्याला लाभ व्हावा, हा कुंभमेळ्याचा हेतू आहे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)

चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकणे !

‘भुशाची संघटित शक्ती म्हणजे लाकूड ! रेतीचे कण संघटित होऊन दगड बनतो. ही जी संघटित करण्याची शक्ती आहे, ते चैतन्यच आहे. अशा चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकते. केवळ निष्क्रीय लोकांची संघटना कुठल्या कामाची ?’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१६)

ईश्‍वरानुसंधान कसे साधावे ?

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन १. साधक : ‘साधक कसा पाहिजे ? जागृत, तत्पर आणि संवेदनशील ! २. यज्ञकर्म : कर्म करतांना त्यात भाव ओतला म्हणजे ते यज्ञकर्म होते. समजून घेऊन भावपूर्ण केलेले कर्म म्हणजे यज्ञकर्म ! त्यातून साधना होते. ३. साधना : मन, इंद्रीय आणि कर्म यांची योग्य सांगड घालून (ज्ञानपूर्ण आणि भावपूर्ण … Read more

भगवंताची वाणी दुसर्‍याला सांगतांना प्रत्येकाने त्यात स्वतःचे मत मिसळल्याने ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाणे, तर केवळ संतच मूळ सत्य स्वरूपाचे ज्ञान जसेच्या तसे कथन करू शकणे

‘भगवंताची वाणी एकाने दुसर्‍याला सांगतांना (परिवर्तित करतांना) त्यामध्ये प्रत्येक जण स्वतःचे मत मिसळत असतो. त्यामुळे ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाते. रज-तमाचे आवरण वाढून ते परिवर्तित होते. यामुळे धर्मग्लानी आली आहे. सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रयोग करतात. एका ओळीत २५ सैनिक उभे करतात. पहिला सैनिक एक गुप्त वार्ता दुसर्‍याच्या कानात सांगून, ती वार्ता जशीच्या तशी पुढील … Read more

मायेतील प्रत्येक वस्तूचा साधनेसाठी सदुपयोग करणे आवश्यक !

‘मायेतील प्रत्येक वस्तूला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहेच. जी मायेतून निर्माण झाली आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा लय होणारच आहे, हे ओळखून तिचा साधनेसाठी सदुपयोग करणे महत्त्वाचे ठरते.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१६)

निष्काम भावाने कार्य करण्याचे महत्त्व !

‘कोणत्याही कर्माचे फलित हे मायेतील असल्यामुळे ते क्षणिक असते. भगवंतप्राप्तीचे कर्म हे कायमस्वरूपी असल्याने ते शाश्‍वत आहे; म्हणून ज्यांनी निष्काम भावनेने सेवा केली, ते कायम आहेत. संतच निष्काम भावाने सेवा करू शकतात. त्यामुळे त्यांची सेवा कायम आहे. जे व्यापारी आहेत, कोट्यधीश झाले, त्यांच्यापैकी एकाचेही नाव इतिहासात येत नाही. तसेच राजकीय लोकांची वा अशा राजांचीही नावे … Read more

धर्मशास्त्रानुसार देवतांची उपासना करून चैतन्यशक्ती वाढवा !

‘हिंदूंनो, धार्मिक उत्सव आणि मंदिरे येथे हिडीस नृत्य करणे, दारू पिणे, भ्रष्टाचार करणे इत्यादी अपप्रकार करणे, ही देवतांची विटंबना आहे. ते एक प्रकारचे मूर्तीभंजन आहे. त्यापेक्षा धर्मशास्त्रानुसार देवतांची उपासना करून चैतन्यशक्ती वाढवा.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सनातनच्या संपर्कात येऊन याच जन्मात सर्व स्वभावदोष नष्ट करण्याची संधी मिळणे, हे सनातनच्या साधकांचे अहोभाग्य !

‘सहस्रो जन्मांनंतर जेव्हा शुभकर्म उदयास येते, तेव्हा त्या जिवाला स्वतःतील स्वभावदोष जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न होते. हे जीव सनातनच्या संपर्कात येऊन साधना करून याच जन्मात आपले सर्व स्वभावदोष नष्ट करत आहेत. आणखी काय पाहिजे ?’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०१७)