तुलनेचीही आवश्यकता !

‘जागृतीसाठी तुलना आवश्यक आहे. तुलनेमुळे आपली स्थिती कळते. पशु-पक्ष्यांना केवळ भोग भोगायचे असतात. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, तर त्याचा लाभ करून घेतला पाहिजे. ‘आज आपण आश्रमात राहिलो नसतो, साधना केली नसती, तर आज आपली परिस्थिती काय झाली असती ? चाकरी केली असती, तरी त्यात किती धन मिळाले असते ? कसे राहिलो असतो ? आतापर्यंतच्या सहस्रो … Read more

अनुभूतीजन्य विचार मार्गदर्शक असणे

‘मनुष्याने विचार करू नये’, असे नसते; मात्र कोणत्या विचारांपासून काय लाभ होतो, हे पहायला पाहिजे. ‘कोणत्या विचारांनी उन्नती होते आणि कोणत्या विचारांनी अवनती होते ?’, हे पहायला हवे. विचार हा मार्गदर्शक आहे. तो वाटाड्या आहे. त्याला ज्ञानाने समर्थ करणे आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे अनुभूतीजन्य विचार. ते घेऊन पुढे चालणे आवश्यक आहे. रानटी लोकांना कोण मार्गदर्शक … Read more

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंता, तू किती रे करतोस ! तूच सर्वत्र कार्य करत आहेस’, अशी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत ठेवली की, अनिष्ट शक्ती रहात नाही. आपला अहं उघड करणे, हा मोठेपणा आहे. त्याने अहं अल्प होतो.’

साधकांनो, जप म्हणजे काय आणि भगवंताचा जप सतत करण्याची आवश्यकता काय ?

‘जप म्हणजे काय ? भगवंताचा सतत जप करण्याची आवश्यक काय ? सतत भगवंताशी अनुसंधानित रहाणे, म्हणजे सतत ‘भागवत’ (भगवंताची स्तुती) चालू रहाणे होय. भागवतातील गोष्टी या अनुभूती आहेत. भगवंताची सतत स्तुती करत रहाणे, हेच जीवनाचे लक्षण आहे. सतत त्याच्या ‘स्मरणात’ रहाणे, हे जीवन आहे. येथे सर्वत्र चैतन्य ठासून भरले आहे. तसेच चैतन्याचे स्मरण करणे, ‘चैतन्याविना … Read more

चैतन्यच कार्य करते !

‘साधकांनो, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या भगवंताने दिलेल्या पंचतत्त्वांतून चैतन्य ग्रहण करणे अन् त्या चैतन्याद्वारे कार्य होत असल्याचे पहाणे, एवढेच आपले काम आहे; कारण चैतन्यच कार्य करते; परंतु आपण बाह्य स्वरूपाकडे पहातो, म्हणजे आवरणाशी संबंध ठेवतो.’ भगवंतावर श्रद्धा हवी ! ‘आपण इतकी वर्षे आयुष्य व्यतित केले, तरी उद्याची चिंता रहातेच. भगवंतावर श्रद्धा नाही. … Read more

निष्काम भक्तीचे महत्त्व

सतत काहीतरी मागणार्‍या मुलापेक्षा काहीच न मागणार्‍या मुलाकडे आईचे जास्त लक्ष असते; कारण तिला ठाऊक असते की, हे मूल काहीच मागणार नाही. तसेच काही न मागणार्‍या भक्ताकडे ईश्‍वराला आपणहून आईसारखे धावून यावे लागते. चूक लिहितांना या प्रसंगात मी माझ्या या दोषामुळे भगवंतापासून दूर गेलो, असे लिहावे.

ईश्वरेच्छेने केलेले कर्म, म्हणजे साधना !

‘प्रार्थना करून भगवंताच्या बुद्धीने, म्हणजे ईश्‍वरेच्छेने केलेले कर्म, म्हणजे साधना ! सहज झालेली कृती, म्हणजेच कर्म; म्हणून भगवंताला प्रार्थना करावी. ‘तोच सर्व करतो’, असा भाव ठेवावा आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करावी.’

चुकीसाठी प्रायश्चित्त घेऊन ती सुधारणे आवश्यक

‘मनुष्य चूक करतो आणि स्पष्टीकरण देतो. ‘स्पष्टीकरण देतो, समर्थन करतो’, म्हणजेच चुकीला जोपासतो आणि चूक वाढवतो. चुकीत वाढ करून तो पापच वाढवतो. त्याने झालेल्या चुकीचे प्रायश्‍चित्त घेऊन चूक सुधारली पाहिजे.’

साधकांनो, परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्या केवळ आज्ञापालनाने उद्धार होणारच आहे, अशी श्रद्धा ठेवून साधना करा !

आम्ही साधक पुष्कळ भाग्यवान आहोत. आम्हाला मानवजन्म मिळाला आहे. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या जन्माचे सार्थक होण्यासाठी निरनिराळे उपाय सांगितले आहेत. त्यांची साधकांवर कृपा आहेच. त्यांच्या केवळ आज्ञापालनाने साधकांचा उद्धार होणारच आहे, हे लक्षात ठेवून साधना करणे, एवढेच साधकांचे कार्य आहे.

समर्थ पाठीशी उभा असल्याची दृढ श्रद्धा असलेला निर्भयपणे कार्यरत रहातो !

समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ?, असे समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे. समर्थ म्हणजे सम + अर्थ होय. समेला अर्थ आहे. त्यात शक्ती आणि चैतन्य आहे. विठ्ठल दोन विटांवर (द्वैत) उभा आहे, म्हणजे तो समेवर (लाभ होवो किंवा अपलाभ होवो, सर्व सारखे) उभा आहे, याचे दर्शक आहे. त्यामुळे कोटी कोटी ब्रह्मांडांचे ओझे … Read more