साधना म्हणजे काय ?

१. ‘लोकांना ‘साधना म्हणजे काय ?’, हे समजले नाही. व्यवहारातील काही न करणे आणि केवळ भगवंताच्या अनुसंधानात रहाणे, एवढेच कार्य करणे म्हणजे साधना ! भगवंतच सर्व करत आहे, करवून घेत आहे, तुम्हाला काहीच करायचे नाही. २. प्रत्येक कर्म ही साधना आहे. ‘प्रत्येक कर्म करतांना साधकाचा प्रत्येक क्षण साधनेत जावा’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा … Read more

आश्रमात रहाण्याचे सौभाग्य !

आश्रमात रहातांना भगवंताच्या सतत अनुसंधानात रहाणे अपेक्षित आहे. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी साधकांची साधनेसाठी सोय व्हावी, यासाठी आश्रमाची निर्मिती केली आहे. या आश्रमात रहाण्यासारखे भाग्य कुठे मिळणार नाही. पैसे देऊन एवढे सौभाग्य मिळत नाही. या आश्रमात आपल्याला विनामूल्य सर्व सौभाग्य मिळत आहे. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

साधकांनो आणि हिंदुत्वनिष्ठांनो, चैतन्यशक्तीला घेऊन साधना करा !

चैतन्य हे खरे कार्य करणारे आहे. (चैतन्यालाच राम किंवा कृष्ण अशी भगवंताची नावे दिली आहेत.) त्याच्या स्मरणात रहाणे, म्हणजे नामस्मरण ! त्याच्याशी सतत संग ठेवणे, म्हणजे सत्संग ! त्याच्या स्मरणात आणि सत्संगात राहून केलेले प्रत्येक कार्य ही सत्सेवा आहे. सत्सेवा झाल्यावर दुर्गुण रहात नाहीत. चैतन्यशक्ती असल्यास अनिष्ट शक्ती कार्य करू शकत नाही. भगवंतच सर्वत्र आहे. … Read more

भगवंताच्या दृष्टीत समत्व असते !

‘भगवंताच्या दृष्टीत समत्व असते. त्याच्यात भेद नसतो. तो मुखवट्याकडे (शरिराकडे / स्थूलदेहाकडे) पहात नाही. त्यातील आत्मतत्त्वाला पहातो. यासाठी बोलतांना आपण मुखवटे (स्थूलदेह) बाजूला करून बोलले पाहिजे. आत्मस्वरूपाशी बोलले पाहिजे; कारण मुखवट्यामध्ये विकार असतात.’ ‘जग तमोगुणी झाल्यामुळे तमोगुणानेच त्याला उत्तर दिले पाहिजे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)

पूर्णस्वरूप श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न म्हणजेच साधना ! – प.पू. पांडे महाराज

या विश्‍वात श्रीकृष्णाविना दुसरे काहीच नाही; म्हणून तो अनन्य आहे. अशा शाश्‍वत तत्त्वाशी एकरूप होऊन त्याच्या पूर्ण तत्त्वाशी संलग्न होणे, म्हणजे साधना. तो आणि मी, माझा जीव आणि ते शिवस्वरूप एक होण्यासाठी सतत त्याचे चिंतन करावे. जीवनातील प्रत्येक कर्म त्याच्या अनुसंधानात राहून करावे. प्रत्येक कार्य आणि कृती त्याची भावपूर्ण सेवा करत आहे, हा भाव ठेवून … Read more

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे. – प.पू. … Read more

उपवासचा अर्थ

उप म्हणजे जवळ. उपवास म्हणजे भगवंताच्या चरणी शरणागत भाव ठेवून वास, म्हणजे वस्ती करणे, म्हणजे रहाणे. २४ घंटे भगवंताच्या अनुसंधानात रहाणे म्हणजे उपवास. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.११.२०१४)

काळजी म्हणजे भगवंतावर अश्रद्धा !

‘आईच्या पोटात असतांना आपली काळजी कोण घेत होते ?’ सहा मासांचे (महिन्यांचे) असतांना दूध मिळेल का ? याची काळजी होती का ? मग आता का आहे ? आतापर्यंतचे आयुष्य एका क्षणात गेले. मग पुढील १० वर्षांची काळजी कशाला ? कोणत्याही प्रकारची काळजी करणे म्हणजे श्रीकृष्णावरील अश्रद्धा होय. काळजी आणि चिंता आपल्याला मागे खेचते. आजपर्यंत इतके … Read more

आत्मशक्तीवर शारीरिक क्षमता अवलंबून असणे

‘आमची क्षमता शरिरावर नाही, तर आत्म्यावर आहे. आत्मानुसंधानाने ईश्‍वरी शक्ती मिळते. अर्जुनाकडे शक्ती होती; पण श्रीकृष्णाने आत्मशक्ती दिल्यावर तो लढू शकला.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०१४)

आवरण वाढण्याची कारणे आणि उपाय

स्वस्तुतीने आवरण वाढते, तर ईश्‍वराची स्तुती केल्याने आवरण घटते. आत्मानुसंधानात न राहिल्याने आपल्याभोवती त्रासदायक आवरण वाढते. त्यामुळे आत्मशक्ती उणावते (बॅटरीतील वीज न्यून होते). सतत आत्मानुसंधानात रहाणे, हाच यावरील उपाय आहे. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१५.७.२०१४)