पुरोगाम्यांची आदिमानवाकडे वाटचाल !

‘मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट ‘मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !’, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदिमानवाकडे होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मानवाची प्रगती’ कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसलेले विज्ञान !

‘पाश्‍चात्त्यांचे विज्ञान सांगते, ‘आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.’ प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता. त्रेता आणि द्वापर युगांत त्याची थोडी अधोगती होत गेली. आता कलियुगाच्या आरंभीच त्याची परमावधीची अधोगती झाली आहे. कलियुगाच्या उरलेल्या अनुमाने ४ लक्ष २६ सहस्र वर्षांत त्याची किती अधोगती होईल, याची कल्पनाही … Read more

कुठे विविध क्षेत्रांतील तज्ञ, तर कुठे संत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. ‘प्रश्‍नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो’, असे म्हणतात. याउलट संत एका क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचा कार्यकारणभाव आणि उपाय सांगतात, जे आधुनिक तज्ञ कधीही सांगू शकत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

‘शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो. गुरुमंत्राचे इतके अनन्यसाधारण महत्त्व असतांना बहुतेक शिष्य गुरुमंत्राकडे दुर्लक्ष करून गुरूंचेच नाव घेतांना दिसतात. यातून त्या शिष्यांची प्रगती होण्याची गती न्यून होतेच, तसेच ते गुरूंच्या सगुण रूपात … Read more

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व लक्षात घ्या !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाल्यामागील कारण !

‘स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, हिंदूंच्या सद्य:स्थितीचा विचार मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर न करता आध्यात्मिक स्तरावर करा !

‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्‍यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्‍यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन्‌ सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निरर्थक बुद्धीप्रामाण्यावादी !

‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आद्य शंकराचार्यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.‘ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले