निराधार हिंदूंकडून साधना करवून घेणे, हाच त्यांच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

हल्लीचे बहुसंख्य धर्माचार्य मिरवणुका, पाद्यपूजा, सन्मान यांशिवाय काय करतात ? बहुतेक कीर्तनकार आणि प्रवचनकार केवळ कीर्तने आणि प्रवचने करतात. त्यामुळे कितीजण साधना करायला लागले, याचा ते विचारही करत नाहीत. मुसलमानांना मुल्ला-मौलवींचा आणि ख्रिस्तींना फादरचा आधार वाटतो. तसा हिंदूंना कोणाचाही आधार वाटत नाही. काही धर्माचार्यांचा हिंदूंना आधार वाटला असता; पण तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यांच्याहीबद्दल हिंदूंच्या मनात विकल्प … Read more

विज्ञानाचे थिटेपण आणि साधनेचे महत्त्व

विज्ञानाला कोणत्याही गोष्टीच्या कार्यकारणभावातील फक्त वरवरचा आणि वर्तमानकाळातील, म्हणजे फारतर १ लक्षांश एवढाच भाग कळतो. याचे कारण हे की, विज्ञानाला आधीचे जन्म, प्रारब्ध इत्यादी काही ज्ञात नसते. त्यामुळे विज्ञानाने सांगितलेली उपाययोजना फारच वरवरची असते. ती मुळापर्यंत जाऊन उपाय करू शकत नाही. एखाद्याला क्षयरोगामुळे खोकला येत असला, तर त्याला केवळ खोकल्याचे औषध देणे जितके हास्यास्पद ठरेल, … Read more

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात तळमळ अत्यावश्यक !

हिंदु जनजागृती समितीतर्फे दुसरे अखिल भारतीय हिंदु अधिवेशन रामनाथी, गोवा येथे ६ ते १० जून २०१३ या काळात आयोजित करण्यात आले होते. त्यांतील बहुतेक प्रतिनिधी साधना करणारे किंवा वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करणारे नव्हते, तरीही त्यांचा उत्साह आणि एकमेकांबद्दलचा प्रेमभाव भरभरून वहात होता. त्यामुळे अधिवेशनात उत्साह वाटत होता. याउलट अधिवेशनासाठी उत्तर भारतातून आलेल्या सनातन संस्थेच्या … Read more

विज्ञानामुळे दुष्परिणाम होण्याची प्रक्रिया

विज्ञानाने शोधून काढलेल्या यंत्रांमुळे दैनंदिन कार्य, प्रवास इत्यादींसाठी लागणारा बराच वेळ वाचला; मात्र त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे व्यसने, स्वैराचार इत्यादी गोष्टींत मानव वेळ घालवू लागला. त्यामुळे त्याची अधोगती अती वेगाने झाली आणि होत आहे. – डॉ. आठवले (१९.१.२०१४)

ऋषींचे सूक्ष्मातील कळण्याचे सामर्थ्य

आपण कानाला रिकामी बाटली, वाटी इत्यादी पोकळी असलेली वस्तू लावली, तर आपल्याला आकाशतत्त्वाचा नाद ऐकू येतो. आपल्याला खोलीच्या पोकळीतील नाद ऐकू येत नाही; मात्र ऋषींना आकाशाच्या पोकळीतील नाद ऐकू येतो. यावरून ऋषींची क्षमता केवढी होती, हे लक्षात येते. – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष नवमी, कलियुग वर्ष ५११५ (२.६.२०१३))

सांप्रदायिक साधनेने जलद प्रगती न होण्याचे कारण

व्हिटामिन ए, बी, सी, डी यांपैकी, तसेच लोह, कॅल्शियम इत्यादी धातूंपैकी जे कमी असेल, ते घ्यायला आधुनिक वैद्य (डॉक्टर) सांगतात. तसेच ज्या देवतेचे तत्त्व कमी असेल किंवा ज्या साधनामार्गाने साधना करणे आवश्यक असेल, त्यानुसार उपासना करायची असते. हे ज्ञात नसल्याने सांप्रदायिक साधना करणारे सर्वजण एकच उपासना करतात. असे करणे हे एखाद्या आधुनिक वैद्यांनी सर्व रुग्णांना … Read more

साधकांनो, उपाय गांभीर्याने करा !

माझा महामृत्यूयोग, साधकांना होणारे त्रास, हिंदु राष्ट्राची स्थापना यांसंदर्भात विविध संतांनी सांगितलेले सर्व उपाय मी करतो. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष ८, कलियुग वर्ष ५११५ (१७.६.२०१३)

समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे … Read more

स्वतःपेक्षा इतरांकडे पहाण्याची कारणे

व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी ती आरशात स्वतःकडे फारच थोडा वेळ पहाते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. अतिपरिचयात् अवज्ञा ।, म्हणजे (आरशात पहाणे) नेहमीचेच झाल्याने त्याचे काही अप्रूप वाटत नाही. २. बहुतेक सर्वच जण बहिर्मुख असल्यामुळे स्वतःकडे पहाण्यापेक्षा त्यांना इतरांकडे पहाणे जास्त आवडते. – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (१३.७.२०१३))

स्वसंरक्षण करण्यासाठी साधनेचे महत्त्व

शिरस्त्राण, चिलखत इत्यादी स्थुलातून आक्रमण झाल्यास त्या त्या भागाचे रक्षण करतात. साधनेमुळे संरक्षककवच निर्माण होते. ते स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरच्या आक्रमणांपासून पूर्ण देहाचे आणि मनाचे रक्षण करते. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))