स्थुलातून पूजा, साष्टांग नमस्कार इत्यादी कृती करण्यापेक्षा त्या मनाने केल्यास अधिक लाभ होणे
याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. स्थुलातून कृती करत असतांना देहाकडेही लक्ष द्यावे लागते. त्याच कृती मनाने करतांना तसे लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे त्या कृती एकाग्रतेने आणि भावपूर्ण करणे सुलभ होते. २. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे. सूक्ष्मतम ईश्वराकडे जाण्यासाठी साधना सूक्ष्मातून करणे अधिक महत्त्वाचे आहे. – डॉ. आठवले (वैशाख अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (८.६.२०१३))