खरी समाजसेवा, म्हणजे समाजाला साधना शिकवणे !

काही जण समाजसेवा करतात. आत्मकेंद्रित, स्वार्थी व्यक्तींपेक्षा समाजसेवा करणारे निश्‍चितच उच्च स्तराचे होत; कारण ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाहीत. असे असले, तरी साधकांनी समाजसेवेत अडकू नये; कारण समाजसेवा करणे हेही सात्त्विक मायेत येते. साधकांना याच्याही, म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जायचे असल्याने त्यांनी समाजासाठी काही करावे, असे वाटत असले, तर समाजाला साधना शिकवावी. त्याच्याकडून साधना करवून … Read more

ऋषींचे अध्यात्मिक महत्व!

ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ? – डॉ. आठवले (७.५.२०१४)

देवळे आणि व्यासपीठ येथे चपला न वापरण्याची कारणे

१. देऊळ आणि तीर्थक्षेत्र अशा चैतन्यमय जागी चपला वापरल्या, तर पावलांतून चैतन्य ग्रहण होत नाही. २. व्यासपीठ व्यासपिठाला व्यासपीठ म्हणतात; कारण त्यावर खरा अधिकार महर्षी व्यासांचाच आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।’ म्हणजे या जगातील अध्यात्मविषयक सर्व ज्ञान हे महर्षि व्यासांचे उच्छिष्ट (उष्टे) आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. आपण तेथे जातो, तेव्हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून … Read more

विभक्त कुटुंब आणि भारताचे विभाजन !

बर्‍याच पती-पत्नींचेच एकमेकांशी पटत नाही. अशा स्थितीत ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहू शकत नाहीत. असे पती-पत्नी समाजाशी आणि राष्ट्राशी कसे एकरूप होणार ? अशा विभक्त कुटुंबांमुळे भारताचे विभाजन होण्यास साहाय्य होत आहे ! – डॉ. आठवले (६.५.२०१४)

इंग्रजीप्रमाणे संस्कृतमध्ये शब्दलेखन (स्पेलिंग) शिकावे न लागणे

याचे कारण हे की, संस्कृतमध्ये उच्चारानुसार लिखाण असते. लिखाण डोळ्यांनी पहातो, म्हणजे ते तेजतत्त्वाशी संबंधित असते, तर शब्दाचा उच्चार करणे हे आकाशतत्त्वाशी संबंधित असते. तेजतत्त्वापेक्षा आकाशतत्त्व वरच्या स्तराचे असल्यामुळे लिखाणानुसार उच्चार न करता उच्चाराप्रमाणे लिखाण करणे आवश्यक असते. – डॉ. आठवले (१५.४.२०१४)

अंधश्रद्धा नाही, तर अंधविश्‍वास हा शब्द योग्य आहे, हेही ज्ञात नसलेले अंनिसवाले !

विश्‍वास हा शब्दांच्या, बुद्धीच्या स्तरावरचा असल्याने तो एकवेळ अंध असू शकतो; पण श्रद्धा ही अनुभूतीच्या स्तरावरील असल्याने कधीच अंध नसते. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

गुरु आणि ईश्‍वर

यांच्या संदर्भात बोलतांना बरेच जण पुढील ओळी सांगतात. गुरु थोर की देव थोर म्हणावा नमस्कार आधी कुणासी करावा । मनी चिंतिता सद्गुरु थोर वाटे तयाचे प्रसादे रघुनाथ भेटे ॥ (पाठभेद – गुरु थोर कि देव थोर म्हणावा नमस्कार आधी कोणा करावा । मना माझीया गुरु थोर वाटे जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ ) त्यांनी हे … Read more

तंत्रशास्त्राची वैशिष्टे

१. तंत्रशास्त्र शक्तीशी संबंधित आहे. त्याच्या पुढे भाव, चैतन्य, आनंद आणि शांती असे स्तर आहेत. २. तंत्रशास्त्राप्रमाणे कृती करतांना बहुदा स्थुलातील वस्तू लागतात, तर भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूतीसाठी स्थुलातील वस्तू लागत नाहीत. ३. व्यवहारातील अडचणी सोडवण्यासाठी तंत्रशास्त्र उपयुक्त आहे. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची हानी कशी होते, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल. १. व्यक्तीस्वातंत्र्यवाले प्राण्यांप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, त्यामुळे ते मनुष्यजन्म वाया घालवतात. २. व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे वागणे स्वकेंद्रित असते. ते इतरांची पर्वा करत नाहीत. यामुळे त्यांचा अहंभाव वाढतो. जितका अहंभाव कमी, तितकी सच्चिदानंदाची अनुभूती अधिक अधिक येते, हे त्यांना … Read more

स्वभावदोष आणि अहं यांच्या त्यागाचे महत्त्व

साधनेत केवळ तन, मन आणि धन यांचा त्याग पुरेसा नाही. अहंचा त्याग महत्त्वाचा असतो. अहंचा त्याग करणे अत्यंत कठीण असल्यामुळे सुरूवातीला तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास सांगितले जाते. त्यांचा त्याग केला, तरी मी त्याग केला, असा अहं रहातो. त्याचबरोबर काही स्वभावदोषही रहातात. यासाठी साधनेत तन, मन आणि धन यांच्या त्यागापेक्षा स्वभावदोष आणि अहं … Read more