सूक्ष्म दृष्टीचे महत्व
सूक्ष्मदर्शक यंत्रातून न पहाणार्याने सूक्ष्म जंतू नसतात, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच साधनेने सूक्ष्म दृष्टी निर्माण न झालेल्याने सूक्ष्म जग नाही. वाईट शक्ती नसतात, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले
सूक्ष्मदर्शक यंत्रातून न पहाणार्याने सूक्ष्म जंतू नसतात, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच साधनेने सूक्ष्म दृष्टी निर्माण न झालेल्याने सूक्ष्म जग नाही. वाईट शक्ती नसतात, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले
‘सूक्ष्मातले कळायला लागल्यावर सुरुवातीच्या काळात एखाद्याला आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसले किंवा जाणवले, तर आग पाण्याने विझते, हे बुद्धीला ज्ञात असल्याने आपतत्त्वाशी संबंधित जलदेवतेचा जप करायला सांगायचो. पुढे अध्यात्माचा अभ्यास झाल्यावर समजले की, आपतत्त्वापेक्षा अग्नी उत्पन्न करणारे तेजतत्त्व अधिक प्रभावशाली आहे. त्यामुळे जलदेवतेचा जप परिणामकारक होणार नाही. तेव्हा तेजतत्त्वाच्या पुढचे तत्त्व म्हणजे वायूतत्त्व किंवा आकाशतत्त्व यांच्याशी … Read more
काही संत त्यांच्या गुरूंकडून आदेश आल्यावर त्याप्रमाणे कार्य करतात, तर काही संत कार्यासंदर्भात काही प्रश्न असल्यास ते गुरूंना सूक्ष्मातून विचारून लगेच उत्तर मिळवतात आणि त्याप्रमाणे कार्य करतात. त्यामुळे त्यांना कार्य लगेच करता येते. – डॉ. आठवले (१८.५.२०१४)
आपण स्वतःलाच जिथे साधनेशिवाय जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही, तिथे भारतमातेला आणि हिंदु धर्माला आक्रमकांपासून काय मुक्त करणार ? – डॉ. आठवले (१५.५.२०१४)
ख्रिस्ती प्रसारक हिंदूंच्या मनात ख्रिस्ती पंथासंदर्भात श्रद्धा निर्माण करू शकतात, तर जन्महिंदूंच्या मनातही हिंदूंना श्रद्धा निर्माण करता येत नाही; कारण ते धर्मशिक्षण देत नाहीत. – डॉ. आठवले (१५.५.२०१४)
विज्ञानाने मानवाचा अभ्यास करणारी अनेक यंत्रे शोधली आहेत. पुढे त्रिगुणांपैकी व्यक्तीतील प्रधान गुण दर्शवणारे यंत्र शोधले की, निवडणुकीला उभे असणार्यांपैकी सात्त्विक कोण ?, हे यंत्र दर्शवील. तो उमेदवार निवडणुकीत जिंकला, असे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे लोकांना खोटी आश्वासने देऊन निवडून येता येणार नाही आणि निवडणुकांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च राष्ट्रासाठी वापरता येईल. – डॉ. आठवले … Read more
राजकारण्यांना सभेला माणसे पैसे देऊन आणावी लागतात, तर संतांच्या सभांना आणि दर्शनाला हजारो, लाखो येतात आणि अर्पणही देतात ! – डॉ. आठवले (१७.५.२०१४)
बुद्धीप्रामाण्यवादी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषावर पडताळून पहाण्यास सांगतात. त्यांना स्वप्न पडताळून पहाण्यास सांगितले, तर ते काय सिद्ध करून दाखवतील ? साध्या स्वप्नाचे विज्ञानाच्या दृष्टीने विश्लेषण करता न येणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अनुभूतींचे काय विश्लेषण करणार ? – डॉ. आठवले (२१.१.२०१४)
‘एखाद्याला शब्दज्ञान किती आहे, याला अध्यात्मात किंमत नाही. टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद व शांती या गोष्टी ओळखता येणे व त्या स्वतःत असणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे. आपल्यापेक्षा २ टप्पे पुढच्या अवस्था ओळखता येतात; म्हणून शक्तीपातळीवाल्यांना भाव व चैतन्य असलेले ओळखता येतात; पण आनंद व शांती या स्थितींतील संत ओळखता येत नाहीत. पुढे … Read more
ज्या विज्ञानाला ईश्वर म्हणजे काय ?, याची तोंडओळखही नाही, ते कधी ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवू शकेल का ? नाही. त्यामुळेच विज्ञानाची किंमत शून्य आहे ! – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष १३/१४, कलियुग वर्ष ५११५ (२१.७.२०१३))