अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

मी संमोहन उपचारतज्ञ म्हणून २५ वर्षे व्यवसाय केला. संमोहन उपचारशास्त्र मानसोपचाराच्या अंतर्गत येते. या उपचाराच्या पद्धतीत संशोधन केल्यामुळे माझे विदेशांत कौतुक झाले. मला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून व्याख्यान देण्यासाठी निमंत्रणही आले होते. अशी पार्श्‍वभूमी असतांनाही मी बरे करू शकत नसलेले रुग्ण संतांच्या उपचारांनी बरे होतात, हे मी अनुभवले. नंतर मी संतांकडून त्यांची उपचारपद्धत शिकण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे … Read more

मानसिकपेक्षा आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांच्या भाषणाचा परिणाम अधिक होणे, तो अधिक काळ टिकणे आणि म्हणूनच धर्मकार्य करणार्‍यांनी साधना करणे आवश्यक !

१. मानसिक (भावनिक) स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : याचा परिणाम तात्कालिक असतोे. सभा संपून श्रोते परतले की, सभेतील भाषण ते थोड्याच वेळात विसरतात. त्यामुळे कार्यासाठी कार्यकर्ते तयार झाले, असे अल्प वेळा दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे राजकारण्यांच्या सभांना हजारो, लाखोंची उपस्थिती असली, तरी त्यांतील फारच थोडे त्यांच्या कार्यात सहभागी होतात. २. आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : … Read more

अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू

भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्‍लोक ११) अर्जुनाला सांगितले, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । म्हणजे हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तिवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

राजकीय पक्षांना नव्हे, तर भक्तांना भारतावर राज्य करू द्या !

राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्वार्थासाठी पक्ष बदलतात, तसे विविध संप्रदायांचे भक्त संप्रदाय पालटत नाहीत; कारण त्यांच्यात गुरु आणि ईश्‍वर यांच्याप्रती श्रद्धा असते. असे असतांना राजकीय पक्षांना भारतावर राज्य करून द्यायचे कि भक्तांना ? – डॉ. आठवले (६.५.२०१४)

चेहरा हसरा ठेवायला शिका आणि स्वतःला आणि इतरांना आनंद द्या !

देवाचे गुण आपल्यात यावे; म्हणून साधक साधना करतात. देवाच्या इतर गुणांकडे त्यांचे लक्ष असते; पण त्याच्या तारक रूपात त्याचा चेहरा हसरा, आनंदी असतो, हे बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, मन आणि शरीर यांचे एकमेकांवर परिणाम होतात. मन गंभीर असेल, तर चेहरा गंभीर दिसतो. याउलट चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, … Read more

उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही !

उपाय म्हणून औषधे घेतल्यास त्यांचा कधी दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ शकतो; पण उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही ! – डॉ. आठवले (१८.६.२०१४)

हिंदु राष्ट्रात खर्‍या संतांनाच स्वतःला महाराज, स्वामी इत्यादी म्हणवून घेण्याचा अधिकार असेल !

हल्ली भोंदू महाराज, स्वामी इत्यादींचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्यांच्यामुळे खर्‍या संतांपर्यंत बहुतेक व्यक्ती पोहोचू शकत नाहीत. भोंदू महाराज आणि स्वामी यांचे पितळ काही काळाने उघड होते. असा अनुभव आला की, सर्वसाधारण जनतेचा खर्‍या संतांवरचाही विश्‍वास डळमळीत होतो. त्यामुळे त्यांचा साधना, अध्यात्म आदी विषयांवरचाही विश्‍वास उडतो. अशा व्यक्ती बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या जाळ्यात सापडतात आणि धर्मद्वेष्ट्या होतात. … Read more

साम्यवाद्यांनो, विश्‍वात साम्यवाद कुठेच नसतो, तर केवळ अद्वैतात असतो, हे लक्षात घ्या !

विश्‍वातील अनंत सजीव आणि निर्जीव गोष्टींच्या प्रत्येक गटात, उदा. माती, वनस्पती, प्राणी, मानव यांत अब्जावधी प्रकार आहेत. असे असतांना साम्यवाद हा शब्द हास्यास्पद ठरतो. साम्यवाद फक्त अद्वैतात असतो; कारण तेथे फक्त ब्रह्मच असते. असे असतांना साम्यवाद हा शब्द उच्चारणे, हे स्वतःला काही कळत नाही, याचे आणि इतरांना हा शब्द सांगणे, हे अज्ञान पसरवण्याचे लक्षण आहे. … Read more

कलेपेक्षा ज्ञान महत्त्वाचे !

कलाकाराने एखादी अप्रतीम कलाकृती कोणाला दाखवली, तर ती पहाणार्‍याला केवळ व्यक्तीगत सुख देते. ती पहाणार्‍याला काही शिकवू शकत नाही. याउलट एखाद्याला अध्यात्म विषयक काही सांगितले, तर त्याला आनंद मिळतो आणि ते ज्ञान इतरांना देऊन तो इतरांनाही आनंदी करू शकतो. याचा अर्थ हा की, कला व्यष्टी साधनेत साहाय्य करते, तर ज्ञान समष्टी साधनेसाठी उपयुक्त आहे. – … Read more

अध्यात्माची श्रेष्ठता!

विज्ञानाचा अभ्यास केलेले अध्यात्मविषयक तत्त्वांचे विश्‍लेषण करू शकत नाहीत; पण अध्यात्माचा अभ्यास केलेले विज्ञानातील तत्त्वांचे अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विश्‍लेषण करू शकतात ! – डॉ. आठवले (१४.६.२०१४)