असे संत हिंदूंपुढे आचारधर्माचा आदर्श काय ठेवणार ?

संत एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करत आहेत, असे बर्‍याचदा पहायला मिळते. विविध संप्रदायांच्या नियतकालिकांतही तसे दर्शविणारी छायाचित्रे असतात. पाश्‍चात्त्यांप्रमाणे फीत कापून उद्घाटन केल्यामुळे दर्शनार्थी हिंदूंवर आपण अयोग्य संस्कार करत आहोत, याचेही त्यांना भान नसते ! – (प.पू) डॉ. आठवले (२०.११.२०१४)

बुद्धीप्रामाण्यवादी आणि प.पू. डॉक्टर यांच्या दृष्टीकोनांतील मूलभूत भेद म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसणे आणि प.पू. डॉक्टरांना जिज्ञासा असणे

बरेच ज्योतिषी माझा मृत्यूयोग जवळ आल्याचे गेली १० वर्षे सांगत आहेत. काही ज्योतिषांना मी जिवंत आहे, हे पाहून आश्‍चर्य वाटते. हे ऐकल्यावर बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतील, बघा. आम्ही म्हणतो ना, ज्योतिषशास्त्र खोटे आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले ! याउलट माझ्या मनात विचार येतो, माझा मृत्यूयोग असूनही मी गेली १० वर्षे जिवंत असण्याचे कारण काय ? जिज्ञासेमुळे … Read more

जशी वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते, तसेच सर्व स्थानदेवता, ग्रामदेवता इत्यादी देवतांचे असते !

जिथे आपल्या देहावरच आपला ताबा नसतो, तेथे आपल्या वस्तू, वास्तू इत्यादींना आपले म्हणायचा आपल्याला काय अधिकार ? आपण ज्या वास्तूत रहातो, ती वास्तू आपल्याला आपली वाटते; पण ती वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते; कारण त्या जागी आपण पुढे असू किंवा नसू, तरी देवता मात्र तेथेच असते. राजकारण्यांनाही वाटते, हा मतदारसंघ माझा. हे गाव माझे. हे … Read more

युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे

२५ वर्षे संमोहन उपचारतज्ञ म्हणून अनेक पती-पत्नींवर त्यांचे आपसात पटत नाही; म्हणून महिनोन्महिने उपाय केले, तरी त्यांचे फारसे जुळत नाही, हे लक्षात आले. याची दोन प्रमुख कारणे आहेत साधनेचा अभाव आणि कालमाहात्म्य. युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे युग पती-पत्नीचे एकमेकांशी पटण्याचे प्रमाण (टक्के) १. सत्ययुग १०० २. त्रेतायुग ७५ ३. द्वापरयुग ५० ४. कलियुग २५ ४ … Read more

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, उच्छृंखलपणा !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. गुन्हेगारांना गुन्हे करायला, रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने, … Read more

अध्यात्मातील ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर लिखाण

ज्ञानपूर्व लिखाण ज्ञानोत्तर लिखाण १. लेखक सर्वसाधारण व्यक्ती संत २. स्तर बुद्धीचा बुद्धीपलीकडील ३. लिखाणाचा उगम ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन अंतःस्फूर्ती (विश्‍वबुद्धीकडून प्राप्त होणारे ज्ञान) ४. चैतन्याचे प्रमाण (टक्के) ० – २ लेखकाच्या आध्यात्मिक स्तरानुसार ५० – ७० ५. लिखाण टिकण्याचा अवधी ५ – ३० वर्षे शेकडो ते हजारो वर्षे – (प.पू.) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

प.पू. डॉ. आठवले यांचा कर्मकांडांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे !

कर्मकांडानंतर उपासनाकांड येते. मी उपासनाकांडांतर्गत नामजपापासून साधनेला आरंभ केला. त्यामुळे मला यज्ञयागादीच नाही, तर साध्या पूजापाठाचीही ओढ नव्हती. असे असले, तरी विविध ठिकाणी होणार्‍या कर्मकांडांचे गेली १५ वर्षे ध्वनीचित्रीकरण करवून घेऊन मी ते संग्रही ठेवले आहे. त्याचा काय उपयोग हे मला ज्ञात नव्हते. २० ते २६ जून २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या तिसर्‍या अखिल भारतीय हिंदू … Read more

नामजप करतांना मन एकाग्र होण्यासाठी वापरावयाच्या पद्धती

" जप करतांना मन एकाग्र झाल्यासच त्याचा लाभ होतो. नामजप करतांना आरंभी मन एकाग्र होणे कठीण जाते; कारण पंचज्ञानेंद्रियांकडून मनाकडे येणार्‍या विविध संवेदना आणि चित्ताकडून मनामध्ये येणारे विविध विचार आणि भावना यांमुळे मन एकाग्र होत नाही. यावर मात करण्यासाठी पुढील उपाय करता येतात. टप्पा १ १ अ. पंचज्ञानेंद्रिये १. नाक : नामजपाच्या ठिकाणी दुर्गंध नसावा. … Read more

प्रकृतीनुसार आणि काळानुसार त्या त्या देवतेची उपासना करणे आवश्यक

गुरुप्राप्ती होईपर्यंत पुढील तत्त्वे लक्षात घेऊन त्यानुसार साधना केल्यास प्रगती लवकर होते. १. व्यष्टी साधना : प्राथमिक टप्प्याची साधना म्हणजे कुलदेवतेची उपासना आणि त्या त्या देवतेची तिच्या त्या त्या सणांच्या दिवशी, तसेच अमावास्या इत्यादी दिवशी करायची उपासना. पुढे गुरुप्राप्ती झाल्यावर गुरु सांगतील, ती उपासना करायची असते. २. समष्टी साधना : ही अधिकतर काळानुसार असते, उदा. … Read more

सध्याचे राजकारणी व हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छ. शिवाजी महाराज यामधील भेद!

छ. शिवाजी महाराजांनी समर्थांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संतांकडून असा आशीर्वाद मिळण्यासाठी एकतरी राजकारणी लायक आहे का ? – डॉ. आठवले (१५.७.२०१४)