कलियुगातील ऋषीमुनी !

प.पू. रामानंद महाराज प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. अण्णा कर्वे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी एखादा राजा अत्याचार करायला लागला, तर ऋषीमुनी त्यांचे तपःसामर्थ्य वापरून त्याला धडा शिकवायचे. कलियुगाच्या सध्याच्या काळात प.पू. रामानंद महाराज, इंदूर यांनी ११.३.२०१४ या दिवशी देहत्याग करीपर्यंत अनेक अनुष्ठाने केली. प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. अण्णा कर्वे, प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी इत्यादी संत अहोरात्र साधना आणि … Read more

श्राद्ध नाही, तर वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग !

वृद्ध आई-वडिलांची, आजोबा-आजींची काळजी न घेता, ते गेल्यावर श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध करणार्‍यांना विधींचा कितपत लाभ होणार ? पूर्वजांचा त्रास होतो; म्हणून नारायण-नागबळी सारखे विधी करणे केवळ स्वार्थी होेत. वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग आहे. वडिलधार्‍यांची सेवा करणे हे कर्तव्यच आहे. त्याचे पालन केले, तर पुण्य लाभत नाही, पण न केल्यास दोष … Read more

मोडकळीस येत असलेली कुटुंबव्यवस्था

हल्ली एकत्र कुटुंब हा शब्द भूतकाळातील आणि अशक्य असा वाटतो. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात केवळ सख्खीच नाही, तर चुलत भावंडेही एकत्र रहात. काही एकत्र कुटुंबांत ४० – ५० व्यक्तीही असत. बर्‍याच कुटुंबांतील वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. काही वर्षांनी तर कुटुंब हा शब्दही उरणार नाही कि काय ?, अशी स्थिती निर्माण … Read more

आई-वडिलांविषयी कृतज्ञता वाटली पाहिजे !

कोणी थोडेफार साहाय्य केले,तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते.आई-वडिलांनी तर जन्म दिला आणि आपल्याला लहानाचे मोठे केले;म्हणून त्यांच्याबद्दल किती कृतज्ञता वाटली पाहिजे !आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची शेवटपर्यंत काळजी घेणे,हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४)

पातळीनुसार भक्तीमार्गातील साधनेचे पुढचे पुढचे टप्पे

हल्ली बहुसंख्य व्यक्ती साधना करत नाहीत. साधना करणार्‍या बहुतेकांना साधनेत पातळीनुसार पालट होत जातो, हे ज्ञात नसते. त्यामुळे ते आयुष्यभर तीच साधना करत रहातात. कोणत्याही योगमार्गाने साधना करत असले, तरी असेच होत असल्याचे लक्षात येते. येथे भक्तीयोगाचे उदाहरण दिले आहे. भक्तीयोगातील प्रगतीनुसार साधनेतील टप्पे : साधनेचा प्रकार आणि स्तर अनुभव आणि अनुभूती साधकाची आध्यात्मिक पातळी … Read more

हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ?

रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाची फुले आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना अधिक प्रमाणात लागतात. आंब्यांच्या झाडाचेही तसेच आहे, आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना जास्त आंबे लागतात. फुले-फळेही आश्रमाच्या दिेशेने जास्त प्रमाणात येतात, तर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ? – (प.पू.)डॉ. आठवले (५.४.२०१४) रामनाथी आश्रमात आल्यावर तीर्थक्षेत्री गेल्याप्रमाणे लाभ होतो. … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना कोण करू शकतील ?

हिंदु राष्ट्राची स्थापना स्वार्थी राजकारणी नाही, तर सर्वस्वाचा त्याग करणारे राष्ट्र आणि धर्मप्रेमी, तसेच साधकच करू शकतील ! – (प.पू) डॉ. आठवले (७.५.२०१४) राजकारणी पैसा, पद देऊ, असे सांगतात, तर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सर्वस्वाचा त्याग करा, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती होईल, असे सांगतात. – (प.पू) डॉ. आठवले (४.१२.२०१४)

व्यष्टी साधनेसाठी गुरुमंत्र, समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसारचा जप आवश्यक

काही जणांना प्रश्‍न पडतो, आम्हाला गुरुमंत्र मिळालेला असतांना आम्ही कालमहात्म्यानुसारचा श्रीकृष्णाचा जप करायचा का ? याचे उत्तर आहे, गुरुमंत्र व्यष्टी साधनेसाठी आहे, तर समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसार श्रीकृष्णाचा जप वर्ष २०२३ पर्यंत आवश्यक आहे. वर्ष २०२४ पासून श्रीरामाचा जप आवश्यक असेल. गुरुमंत्र काळानुसार पालटत नाही, तर समष्टी साधनेसाठीचा जप कालमहात्म्यानुसार पालटतो. – (प.पू) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

व्यष्टी आणि समष्टी साधनेतील भेद आणि समष्टी साधनेचे महत्त्व

१. ईश्‍वर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे, तसाच सर्वव्यापीही आहे. त्यामुळे ईश्‍वरप्राप्तीचे, म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होण्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म होणे, म्हणजेच शून्यात जाणे किंवा सर्वव्यापी होणे, हे दोन मार्ग आहेत. सूक्ष्मातीसूक्ष्म होणे हा मार्ग व्यष्टी साधना करणार्‍यांचा असतो, तर समष्टीशी एकरूप होण्यासाठी आपली व्यापकता वाढवणे, हा मार्ग समष्टी साधना करणार्‍यांचा असतो. व्यष्टी साधना करता करता पुढे शून्यात जाऊन ईश्‍वराशी एकरूप … Read more

खर्‍या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक-दोन पिढ्या लागणार असल्याचे कारण

मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात, हेच त्यांचे शिक्षण योग्य नसल्याचे एकमेव कारण नाही. घरी होणारी भांडणे, तसेच दैनिकांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर येणार्‍या स्वैराचार, भ्रष्टाचार, जात्यंधता, अपहरण, बलात्कार, खून इत्यादी बातम्या यांमुळेही त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होतात. पुढे अशा बातम्यांचे त्यांना काही वाटेनासे होते आणि काही काळानंतर त्यांच्यातील काहीजण या गोष्टी स्वतःही करू लागतात. मुलांवर अनिष्ट संस्कार होऊ … Read more