पर्यटकांना आकृष्ट करणारे अध्यात्मशास्त्र भारतात असतांना त्याचा लाभ न घेता केवळ मौजमजेच्या जाहिराती करणारी सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे देशाला अत्यंत हानीकारक !

पर्यटकांनी आकृष्ट व्हावे; म्हणून सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे जाहिरातींवर प्रतीवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. वर्ष २०१६ मध्ये केवळ केरळ राज्य ८० कोटी रुपये खर्च करणार आहे ! पाश्‍चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण करणार्‍या सरकारांनी भारतात आदर्श पर्यटन आयोजित करावे, हे अपेक्षित नाही ! अध्यात्म लाखो जणांना शेकडो वर्षे भारताकडे खेचत आहे. हा केवळ इतिहासच नाही, तर … Read more

सांप्रदायिकांनो, आपल्या संप्रदायाचा अहंकार सोडा, तरच प्रगती होईल !

हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनो, इतर संघटनाही आपल्याच आहेत, हा दृष्टीकोन ठेवा, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल ! अनेक सांप्रदायिकांना आपल्या संप्रदायाचा अहंकार असतो. इतर सर्व संप्रदाय तुच्छ आहेत, असे त्यांना वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, विविध संप्रदाय हे भवरोगातून मुक्त व्हायचे, ईश्‍वरप्राप्तीचे विविध मार्ग आहेत. रोगापासून मुक्त होण्यासाठी ज्याप्रमाणे निरनिराळी … Read more

संत नको म्हणत असतांना त्यांना आपल्या स्वेच्छेने नमस्कार करणे अयोग्य

मी कोणाकडून नमस्कार करून घेत नाही; कारण मला मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे, याची सतत जाणीव असते. हे सनातनच्या साधकांना ज्ञात आहे; मात्र भेटायला येणारे नको म्हटले, तरी नमस्कार करतात. त्या नमस्कारावरून ते स्वेच्छेने भावनेपोटी नमस्कार करत असल्याचे लक्षात येते; कारण साधनेत असलेला आपल्यापेक्षा साधनेत पुढे असलेल्याचे आज्ञापालन करतो, म्हणजेच परेच्छेने वागतो. – … Read more

वृद्धाश्रम चालवणार्‍यांनो,वृद्धाश्रमात रहाणार्‍यांकडून साधना करवून घ्या !

बर्‍याच वृद्धाश्रमांच्या पत्रकांत आणि जाहिरातींत तेथे काय सोयी आहेत, याची माहिती असते. वृद्धांच्या करमणुकीसाठी एखाद्या कार्यक्रमाला किंवा सहलीलाही त्यांना घेऊन जातो, असेही त्यात सांगितलेले असते. वृद्धाश्रमात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवरची काळजी घेतली जात असले, तरी आध्यात्मिक स्तरावर काळजी घेतली जात नाही. बहुतेक वृद्धांनी आयुष्यभर साधना केलेली नसते. आता त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात तरी … Read more

संतांकडे आशीर्वाद मागावा लागत नाही !

काही जण संतांकडे गेल्यावर आशीर्वाद मागतात. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, साधना चांगली असेल, तर आशीर्वाद न मागताही मिळतो आणि साधना चांगली नसेल, तर आशीर्वाद मागूनही मिळत नाही. सनातन संस्थेला अनेक संतांनी स्वतःहून आशीर्वाद दिले आहेत, ते कार्य चांगले असल्यामुळेच ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्थेच्या शिकवणीचे ध्येय

कीर्तनकार किंवा प्रवचनकार निर्माण करणे, हे सनातन संस्थेचे ध्येय नसून संत तयार करणे हे ध्येय आहे. त्यामुळे सनातनमध्ये साधकांना जी शिकवण दिली जाते, ती पांडित्य शिकवणारी नसते, तर साधकत्व शिकवणारी असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि प्रवचनकार

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते केवळ प्रवचने करत नाहीत, तर धर्मसत्संग घेतात आणि त्याद्वारे सत्संगाला येणार्‍यांची साधनेत प्रगती होईल, असे करतात. प्रवचनकारांप्रमाणे श्रवणभक्तीची आणि कौतुकाची अपेक्षा करत नाहीत. – (प.पू.) डॉ. आठवले

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केल्याने ते बलहीन होणे आणि त्यामुळे त्यांची स्थिती केविलवाणी होणे

मुसलमानांमध्ये धर्माविषयी बुद्धीभेद करणारे बुद्धीप्रामाण्यवादी नसल्याने त्यांच्यात एकजूट आहे आणि त्यामुळे ते आज सर्व जगाला भारी पडत आहेत. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केल्याने हिंदू साधनेपासून दूर गेले आणि त्यामुळे ते बलहीन झाले. – (प.पू.) डॉ. आठवले

उन्नतांनी स्थुलातील कार्य सहसा न करण्याची कारणे

राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अतिशय गंभीर असूनही संत त्या संदर्भात काही का करत नाहीत ?, असा प्रश्‍न काही जणांना पडतो. त्याचे उत्तर येथे दिले आहे. १. कालमाहात्म्य जाणणे : काही केले नाही, तरी २०२३ या वर्षी हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे, हे ज्ञात असल्याने हल्लीच्या उन्नतांना त्या संदर्भात काही करावेसे वाटत नाही. २. सर्व … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची फलनिष्पत्ती शून्य असण्याचे कारण

एखाद्या विषयाचा त्या विषयाच्या पद्धतीनुसार अभ्यास केला नसला, तर त्याविषयी ठामपणे माझेच म्हणणे बरोबर आहे, असे कोणी म्हटले, तर ते कोणी गांभीर्याने घेत नाही. तीच स्थिती बुद्धीप्रामाण्यवाद्यांची असते. अध्यात्माचा अभ्यास, म्हणजे साधना न करता ते त्यासंदर्भात बोलत रहातात; म्हणून त्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची फलनिष्पत्ती शून्य असते ! – (प.पू.) डॉ. आठवले