भारताचे प्रारब्ध पालटण्यासाठी आध्यात्मिक स्तराचे उपायच आवश्यक !

‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी हे करा !

‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी इतिहासातून स्फूर्ती घ्या !

‘रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांचे श्रेष्ठत्व !

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परिपूर्ण हिंदु धर्म !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अद्वितीय हिंदु धर्म !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांना नीती आणि धर्म शिकवा !

‘पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मोक्षप्राप्ती व्हावी’, असे वाटणे आणि ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटणे

‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिकवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

‘ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे … Read more