त्याग आणि दान
एखाद्या गोष्टीचा त्याग करतांना त्या गोष्टीवरील आपले स्वामीत्व सोडले जाते, उदा. संसाराचा त्याग करून संन्यासी बनणे. याचा स्वतःला लाभ होतो; पण दुसर्याला होत नाही. दान करतांनाही स्वामीत्व सोडले जाते. तेव्हा त्याचा दुसर्याला लाभ होतो. ते दान सत्पात्राला केल्यास स्वतःलाही योग्य साधना झाल्यामुळे लाभ होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले