पांडित्य आणि साधना
१. पोहोण्याचे पुस्तक वाचून पोहता येत नाही, तसे नामजपाची अनेक पुस्तके वाचून नामजप होत नाही किंवा साधनेवरील अनेक पुस्तके वाचून साधना होत नाही; कारण साधना हे कृतीचे शास्त्र आहे. २. ग्रंथांचा अभ्यास करून त्यांतील विषयावर एखाद्या प्राध्यापकांप्रमाणे प्रवचन देता येईल; पण त्यामुळे साधनेत प्रगती होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले