साधे औषध कोणते घ्यायचे, हे बहुमताने ठरवत नाहीत; मात्र राज्य…
साधे औषध कोणते घ्यायचे, हे बहुमताने ठरवत नाहीत; मात्र राज्य कोणत्या पक्षाने करावे, हे बहुमताने ठरवतात. यापेक्षा हास्यास्पद जगात काय असेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधे औषध कोणते घ्यायचे, हे बहुमताने ठरवत नाहीत; मात्र राज्य कोणत्या पक्षाने करावे, हे बहुमताने ठरवतात. यापेक्षा हास्यास्पद जगात काय असेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्या संजीवन समाधीच्या वेळी लोकशाही नव्हती, हे बरे होते, नाहीतर सर्व पक्षांनी एकमताने त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असता ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास त्यांना दिशा मिळावी, यांसाठी असतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कोणी छोटेसे साहाय्य केले, तरी साहाय्य घेणारा थँक यू (आभारी आहे), असे म्हणतो; पण देवाने आपल्याला जन्म दिला, बालपणी संगोपन करायला आई-वडील दिले आणि जन्मभर आपली काळजी घेतली, तरी कोणालाच देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
धान्य, कपडे, वीज, दूरभाष, प्रवास इत्यादी सर्वांसाठी पैसे द्यावे लागतात; पण फुकट मिळणारे सूर्यकिरण आणि हवा यांबद्दल मानवाला देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हिंदु धर्म आणि भारत यांची काहीच माहिती नसलेले धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही होतात, तर त्यांच्या संदर्भात माहिती असलेले त्यांच्यापुढे नतमस्तक होतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हिंदूंनो, राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला नोकरी मिळावी, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात रहायला जन्म हिंदू नाही, तर व्यष्टी साधना करणारे किंवा समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात समष्टी साधना करणारे लायक असतील. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
म्हातारपण मुलामुळे नाही, तर साधनेमुळे आनंदात जाते ! : मुलावर गर्भधारणेपासून साधनेचा संस्कार न करता त्याला जन्म देणे, त्याचे संगोपन करणे, त्याचा विवाह होईपर्यंत त्याचे सर्व करणे, ही सर्व तन, मन आणि धन यांची चुकीची गुंतवणूक झाल्याचे म्हातारपणी मुलाने लाथाडल्यावर आई-वडिलांच्या लक्षात येते. एवढ्या मोठ्या गुंतवणुकीतून ही प्राप्ती झाल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी तन, मन आणि … Read more
गुंड धमकावून आणि राजकारणी भ्रष्टाचार करून पैसे लुबाडतात, तर संतांना धार्मिक वृत्तीचे लोक स्वतःहून अर्पण देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले