कलियुगापूर्वीच्या युगांत राजांना ऋषी-मुनी मार्गदर्शन करायचे. आता मला अनेक ऋषी-मुनी…

कलियुगापूर्वीच्या युगांत राजांना ऋषी-मुनी मार्गदर्शन करायचे. आता मला अनेक ऋषी-मुनी नाडीपट्ट्यांद्वारे मागर्दर्शन करत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतियांच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण करू न शकणारे सर्वपक्षीय…

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतियांच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण करू न शकणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते हिंदु राष्ट्राची स्थापना किती अपरिहार्य आहे, हे सिद्ध करतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे विदेशातून येऊन भारतावर राज्य करणारे मुसलमान आणि ख्रिस्ती, तर…

कुठे विदेशातून येऊन भारतावर राज्य करणारे मुसलमान आणि ख्रिस्ती, तर कुठे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतातील असूनही भारतावर राज्य करता न येणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे दुष्काळावर वरवरचे उपाय करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, तर कुठे बार्शीचे…

कुठे दुष्काळावर वरवरचे उपाय करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, तर कुठे बार्शीचे अश्‍वमेधयाजी पू. नाना काळे ! : दुष्काळ का होतो, हे समजून न घेता, टँकरने आणि आगगाडीने पाणी पाठवू !, असे राज्यकर्ते म्हणतात. अवर्षणग्रस्त भागातील साहाय्यातही भ्रष्टाचार करतात. मानवाच्या पापाचे भोग त्याला भोगावे लागत आहेत. ते अल्प करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे एकही राजकारणी सांगत … Read more

आपला मुलगा कसा वागतो, याकडे दुर्लक्ष करणारे पालक जसे त्याच्या…

आपला मुलगा कसा वागतो, याकडे दुर्लक्ष करणारे पालक जसे त्याच्या चुकांना उत्तरदायी असतात, तसेच आपले कार्यकर्ते, प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी, तसेच पोलीस इत्यादी कसे वागतात, यांकडे दुर्लक्ष करणारे राज्यकर्ते प्रजा व्यसनी, जुगारी, भ्रष्टाचारी बलात्कारी इत्यादी झाली की, त्यांच्या चुकांना उत्तरदायी असतात ! त्या चुकांचे पाप त्यांना अनेक जन्म भोगावे लागते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपला मुलगा कसा वागतो, याकडे दुर्लक्ष करणारे पालक जसे दोषी…

आपला मुलगा कसा वागतो, याकडे दुर्लक्ष करणारे पालक जसे दोषी असतात, तसेच आपले कार्यकर्ते, प्रशासन, पोलीस इत्यादी कसे वागतात, यांकडे दुर्लक्ष करणारे राज्यकर्ते तीव्र पापाचे धनी होतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्रसेवा म्हणून पोलीस दलात विनावेतन नोकरी करा, असे सांगितले, तरी…

राष्ट्रसेवा म्हणून पोलीस दलात विनावेतन नोकरी करा, असे सांगितले, तरी बहुतेक पोलीस नोकरी सोडणार नाहीत; कारण त्यांना त्यांच्या पगाराच्या अनेक पटींनी वरची रक्कम मिळते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, १००० वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी क्षात्रवृत्ती निर्माण करा !…

हिंदूंनो, १००० वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी क्षात्रवृत्ती निर्माण करा ! : भारतातील हिंदूंमधील क्षात्रवृत्तीच्या अभावामुळे त्यांनी सुमारे १००० वर्षे पारतंत्र्य भोगले. प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर देशद्रोही अन् धर्मद्रोही राजकीय पक्ष यांच्या पारतंत्र्यात राहिलेल्या हिंदूंना आता केवळ धर्मशिक्षण आणि धर्मक्रांतीच वाचवू शकेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा…

जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा म्हणता येईल. त्याचप्रमाणे राष्ट्र आणि धर्म मृत्यूशय्येवर असतांना तशा जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणे, याला महामूर्खपणा म्हणता येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले