रामनाथी आश्रमात वायुतत्त्वाची अनुभूती स्पर्शाच्या माध्यमातून येणे : माझ्या खोलीत…

रामनाथी आश्रमात वायुतत्त्वाची अनुभूती स्पर्शाच्या माध्यमातून येणे : माझ्या खोलीत अधिक प्रमाणात, तर आश्रमात सर्वत्र अल्प प्रमाणात जमिनीला पावलाने स्पर्श केला, तर अनेक साधकांना सौम्य आनंददायी झिणझिण्या जाणवतात. हे जमिनीत वायुतत्त्व कार्यरत झाल्याचे लक्षण आहे. काही साधकांना गुडघ्यापर्यंत, तर काहींना हातांत किंवा डोक्यातही तशा संवेदना जाणवतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वयंपाकाची अनेक पुस्तके वाचूनही स्वयंपाक करता येत नाही. त्याप्रमाणे साधनेसंदर्भात…

स्वयंपाकाची अनेक पुस्तके वाचूनही स्वयंपाक करता येत नाही. त्याप्रमाणे साधनेसंदर्भात शेकडो पुस्तके वाचूनही साधना होत नाही. स्वयंपाक करण्याप्रमाणे साधनेची कृती करणे आवश्यक असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे…

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे आणि हिंदु राष्ट्रच रामराज्य असेल ! : सर्वधर्मसमभाव, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादी विचारसरणींची सर्वपक्षीय सरकारे शाळेत साधना न शिकवता भाषा गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नसलेले विषय शिकवतात. पुढे परिणामस्वरूप भ्रष्टाचार, व्यसने, गुंडगिरी, बलात्कार इत्यादी वाढल्यावर सरकारे त्यांवर वरवरचे उपाय करण्याचा हास्यास्पद प्रयत्न … Read more

कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधिश,…

कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधिश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्र्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे सर्व…

कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे सर्व राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे विश्‍वची माझे घर । म्हणणारे संत ज्ञानेश्‍वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कलियुगातील सध्याच्या काळात जनता रज-तमप्रधान असल्यामुळे ती निवडून देणारे लोकप्रतिनिधीही…

कलियुगातील सध्याच्या काळात जनता रज-तमप्रधान असल्यामुळे ती निवडून देणारे लोकप्रतिनिधीही रज-तमप्रधान आहेत. त्यामुळे देश परमावधीच्या अधोगतीला गेला आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन तात्त्विक नाही, तर प्रायोगिक प्रत्यक्ष साधना शिकवते; कारण तात्त्विक…

सनातन तात्त्विक नाही, तर प्रायोगिक प्रत्यक्ष साधना शिकवते; कारण तात्त्विक ज्ञान कितीही जन्म शिकले, तरी शिकून पूर्ण होत नाही. याउलट प्रत्यक्ष साधना शिकल्यामुळे साधकांची जलद गतीने आध्यात्मिक प्रगती होऊन ते जन्म-मृत्यूच्या चक्रांतून बाहेर पडतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्था कधी कोणाकडे मदत मागत नाही; कारण साधकांच्या भक्तीभावामुळे…

सनातन संस्था कधी कोणाकडे मदत मागत नाही; कारण साधकांच्या भक्तीभावामुळे देव सर्वकाही करतो, अशा साधकांना अनुभूती येतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभमेळे इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत…

मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभमेळे इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना पैसे देऊनही किती उपस्थिती असते ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले