मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे…

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाहीत; म्हणून मी नेहमी आनंदात असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या…

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पोलीस आणि न्यायाधिश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका…

पोलीस आणि न्यायाधिश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात गुन्हेगार कोण आहे, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रूपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक…

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नसण्याची कारणे : बौद्ध, जैन, ईसाई, इस्लाम इत्यादी धर्मांचे (खरे तर संप्रदायांचे) संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. धर्म इतका अथांग आहे की, कोणी एक त्याची स्थापना करू शकत नाही. २. धर्मात कालमहात्म्यानुसार जो पालट होतो, तो सांगायला … Read more

जातीच्या बंधनातून बाहेर पडत असणारे सनातनचे वधू-वर साधक ! :…

जातीच्या बंधनातून बाहेर पडत असणारे सनातनचे वधू-वर साधक ! : समाजातील बर्‍याच वधू-वरांच्या विज्ञापनांत जातीचा हवा / हवी, असे लिहिलेले असते. त्याचप्रमाणे सनातनचे बरेच वधू-वर साधक आणि साधिका यांच्या विज्ञापनांत सनातनचा हवा / हवी, असे असते, म्हणजे सनातनचे साधक आणि साधिका आता जातीच्या बंधनातून बाहेर पडून धर्माकडे वाटचाल करत आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे,…

व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे, हेही व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांच्या लक्षात येत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे इत्यादी…

विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट…

विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी,…

कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी, तर कुठे हे विश्‍वची माझे घर, असे म्हणणारे व्यापक दृष्टीचे संत ज्ञानेश्‍वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. डॉक्टर संमोहन उपचारतज्ञ असण्याचा त्यांना आध्यात्मिक संशोधनात झालेला लाभ…

प.पू. डॉक्टर संमोहन उपचारतज्ञ असण्याचा त्यांना आध्यात्मिक संशोधनात झालेला लाभ : मी साधनेत खूप उशिरा, म्हणजे ४२ व्या वर्षी आलो, याचे मला वाईट वाटायचे. आज लक्षात आले की, प्रत्यक्षात मला त्याचा आध्यात्मिक क्षेत्रातही लाभच झाला आहे. १. मनोरुग्णांवर उपाय करण्यासाठी काही संमोहन उपचारपद्धती शोधल्या. त्यामुळे स्वभावदोष आणि अहं दूर कसे करायचे, हे रुग्णांना शिकता आल्याने … Read more