मृत्यूतून वाचल्यावरच जीवनाचे मोल कळते !
‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)
‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)
‘भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७४ वर्षांत काँग्रेसने निवळ हिंदुद्वेष आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले. भारताला आणि हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी साम, दाम, दंड अन् भेद अशा सर्व नीतींचा वापर केला. काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध … Read more
‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसर्या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०२२)
‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१ अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘संत बहिणाबाईंनी ‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, तेव्हां मिळते भाकर !’ हे जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१.२०२२)
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म अन् मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘स्वातंत्र्योत्तर काळात समाजधुरिणांनी समाजाला ‘अध्यात्म आणि साधना’ हे विषय शिकवलेच नाहीत. तथाकथित ‘सुधारणावादा’च्या नावाखाली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लोकशाहीत कायदे सिद्ध करतांनाही याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आता एखादा लहान मुलगा त्यांच्या पूर्वजन्मीच्या साधनेच्या संस्कारामुळे या जन्मात साधना म्हणून सेवा करू लागल्यास त्याचे कौतुक होत नाही, उलट त्याच्यावर टीका होऊन तो सात्त्विक जीवही साधना … Read more
‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले