‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !
‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विविध धार्मिक ग्रंथांचे कित्येक वर्षे काही लाख वेळा पठण केलेल्यांची साधनेत विशेष प्रगती झालेली आढळून येत नाही. याचे कारण हे की, ते नुसतेच पठण करतात. त्यात शिकवलेली साधना कृतीत आणत नाहीत. साधना करण्याची खरोखरीची इच्छा असणाऱ्यांनी ‘स्वत:कडून ही चूक होत नाही ना ?’, इकडे लक्ष द्यावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.३.२०२२)
‘साधना करणारा एखादा युवक त्याच्या जीवनाचे ‘साधना करणे’, हे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे नातेवाइक जगरहाटी म्हणून ‘लग्न कर’ यासाठी त्याच्या पाठी लागतात. त्याचे लग्न लावून दिल्यावर नातेवाइक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्याला साधनेसाठी किंवा संसारासाठी साहाय्य करत नाहीत. त्यामुळे तो युवक संसाराच्या अडीअडचणींमुळे साधनेपासून दूर … Read more
‘व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब, तिचे झोपेपुढे काही चालत नाही. झोप आली की, तिला झोपावेच लागते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.२.२०२२)
‘आपण देवाच्या नावे सर्व करतो, तसे देवही आपल्या नावे सर्व करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.२.२०२२)
‘म्हातारपणात विविध अवयवांची क्षमता अल्प होते, तसेच ऐकू येण्याची क्षमताही न्यून होते. त्यामुळे इतरांचे बोलणे ऐकू येईनासे झाले की, वयस्करांना ‘इतर इतक्या हळू आवाजात का बोलतात ?’, असा प्रश्न पडतो; पण ‘स्वतःची ऐकण्याची क्षमता अल्प झाली आहे’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे मीही अनुभवतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१०.२०२१)
‘आधुनिक वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) हे आजाराचे केवळ शारीरिक, म्हणजेच वरवरचे निदान करते. त्याचे मूळ कारण शोधू शकत नाही. आजाराचे मूळ आध्यात्मिक कारण असते, उदा. त्या रुग्णाचे प्रारब्ध, त्याला असणारा वाईट शक्तींचा त्रास इत्यादी. आधुनिक वैद्यकशास्त्र हे शोधून त्यांवर उपाययोजना काढू शकत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ऋषिमुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.२.२०२२)