ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

राष्ट्र आणि धर्मप्रेम !

‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

…तरच हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल !

‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यावरच ४ – ५ पिढ्यांत राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

लोका सांगे ब्रह्मज्ञान !

‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

किती जन्म घेऊ देवा !

‘किती जन्म घेऊ अभ्यास करण्या, ज्ञान तुझे अनंत । ज्ञानाऐवजी तूच मला हवास, देवा अनंता ।।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)

संतांप्रती भाव असण्याचे महत्त्व !

‘आपण संतांच्या केवळ चरणांना स्पर्श करून भावपूर्ण नमस्कार करतो. तेव्हा त्यांच्या चरणांमधून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याने आपल्याला लाभ होतो. याउलट मर्दन करणारे संतांचे संपूर्ण अंग रगडतात; पण त्यांच्यात संतांप्रती भाव नसल्याने त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१०.२०२१)