अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती होण्यामागील कारण !

डॉक्टर नसलेल्याने रुग्णांवर उपाय करणे, याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्‍या जनतेला राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्‍या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना असलेला व्यर्थ अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराविना दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्‍वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना ही मानवासाठी अनन्यसाधारण !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अध्यात्माचे महत्त्व

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती तुच्छ आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वार्थत्यागी सांप्रदायिक

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ

‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले