म्हातारपणाचा लाभ मृत्यूही हवासा वाटणे

‘म्हातारपणात शरीर कोणत्याही स्तरावर साथ देत नसले की, अंथरुणावर खिळून रहावे लागते. अशा स्थितीत ना पैसा कमावण्याची इच्छा होते ना आयुष्यभर स्वकष्टाने कमावलेला पैसा ‘खाणे, पिणे आणि फिरणे’ यांसारख्या सुखांसाठी खर्च करण्याची इच्छा होते. अशा वेळी आयुष्यभर नको असलेला मृत्यूच हवा-हवासा वाटू लागतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे ऋषि-मुनी !

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्मदेहाने विश्‍वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ –सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सुखासाठी कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी सध्याची पिढी !

​‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवाच्या कृपेचे महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधना’ हीच खरी लस

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देश रसातळाला जाण्यामागील कारण !

‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सर्व समस्यांवर एकच उत्तर : हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

​‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई वडिलांविषयी कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते. ​पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्चर्य ते काय ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समाजपुरुषाने साधना करण्याचे महत्त्व !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातील कायदे !

‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले