सूक्ष्मातीसूक्ष्म जग आणि साधनेचे महत्त्व !

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मबंधनाचे महत्त्व

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताची दुर्दशा !

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भगवान श्रीकृष्ण ‘हिंदु राष्ट्र’ आणेलच !

ईश्वरी योजनेनुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. संत आणि द्रष्टेपुरुष यांनाही त्याचे वेध लागले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर गोप-गोपींनी ज्याप्रमाणे स्वतःचे कर्तव्य म्हणून त्यांच्या काठ्या गोवर्धन पर्वताला लावल्या, त्याप्रमाणे आपल्यालाही आपले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कर्तव्य बजावायचे आहे. आपण साधना म्हणून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासमवेत … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना आवश्यक !

‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचसमवेत तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे. नामजपाने प्रत्येक कर्म अकर्म होते, म्हणजे त्या कर्माचे पाप-पुण्य लागत नाही. यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या (सनातन … Read more

‘साधना न करता हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) येईल’, असे समजू नका !

पराक्रमी असणार्‍या पांडवांनाही कौरवांविरुद्धच्या युद्धात श्रीकृष्णाचे साहाय्य घ्यावे लागले, तर श्रीकृष्ण आणि साधना यांविना ‘आम्ही हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करू’, असे म्हणणे किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येईल. ‘साधनेचे बळ आणि समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक क्रांतीविरांमध्ये प्रखर राष्ट्राभिमान असूनही साधनेचे बळ … Read more

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरण करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवा !

‘धर्माचरण आणि साधना केल्याने हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कळल्यानंतरच खरा धर्माभिमान निर्माण होऊन समाज, राष्ट्र अन् धर्म यांचे खरे हित साधण्यासाठी प्रयत्न होतात. धर्माचरण आणि साधना केल्यामुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्‍यांनी धर्महानी केल्यास ती त्यास विरोध करते; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य … Read more

म्हातारपण, म्हणजे दुसरे बालपण – ‘आई गं’ !

‘म्हातारपणी शरीर जर्जर होऊन कोणतीही हालचाल करतांना वेदना अनुभवयास येतात. त्या वेदनांमुळे आपोआपच तोंडातून ‘आई गं’ हा शब्द बाहेर पडतो ! लहान मुलाप्रमाणे म्हातारपणातही अशी आईची सतत आठवण काढणे, म्हणजे दुसरे बालपणच अनुभवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या साधनेचे वैशिष्ट्य

‘साधनेचे एक मूलभूत तत्त्व आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग !’ अशी साधना केवळ सनातन संस्थाच शिकवते. प्रत्येकाचा साधनामार्ग, उदा. भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी आणि आध्यात्मिक पातळी, वय, शारीरिक क्षमता इत्यादी निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येकाची प्रकृती पाहून सनातनमध्ये प्रत्येकाला निरनिराळी साधना सांगितली जाते. डॉक्टर जसे प्रत्येक रुग्णाला निरनिराळे औषध देतात, विद्यार्थी जसे निरनिराळे शिक्षण घेतात, … Read more

सनातन संस्थेचे महत्त्व

‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले