संताना राग येण्यामागील कारण !

‘सर्वसाधारण व्यक्ती रागावते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’ – (परात्पर गरु) आठवले

मनाचे महत्त्व !

‘पंचज्ञानेंद्रिये नाक (गंध), जीभ (चव), डोळे (दृश्य), त्वचा (स्पर्श) आणि कान (ऐकणे) हे अनुभव घेतात; पण त्यातून मिळणारे सुख-दुःख मनालाच मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सात्त्विक व्यक्तींचे ध्येय !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

‘आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात. कलियुगात स्वभावदोष अनेक असल्याने आधी ते दूर करावे लागतात. मगच साधना करता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.६.२०२१)

एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ?

‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ? हे सांगण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित विद्वान, हे लक्षात घेत नाहीत की, ऋषी-मुनींनी सांगितलेले सत्य चिरंतन आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न तथाकथित विद्वानांनी केला पाहिजे. त्यामुळे ‘मनूचे मत’ असे न म्हणता ‘मनूने सांगितलेले शास्त्र’ असे म्हटले पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सूक्ष्मातीसूक्ष्म जग आणि साधनेचे महत्त्व !

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मबंधनाचे महत्त्व

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताची दुर्दशा !

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले