हिंदु राष्ट्रातील राजकारणी कसे असतील ?

‘हिंदु राष्ट्रात ‘स्वतःकडे सत्ता असावी’, अशा विचाराचे स्वार्थी आणि अहंभावी राजकारणी नसतील, तर ‘मानवजातीने साधना करून ईश्वरप्राप्ती करावी’, या विचाराचे धर्मसेवक आणि राष्ट्रसेवक असतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा !

‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील असल्याने केवळ तोच साधना करू शकतो !

‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (५.४.२०२२)

परिपूर्ण सेवेचे महत्त्व !

‘सेवा केल्यास त्याचा ३० टक्के लाभ होतो. सेवा चांगली केली, तर ५० टक्के आणि परिपूर्ण केली, तर १०० टक्के लाभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.४.२०२२)

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्माचे महत्त्व !

‘धर्म पाप-पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भांत शिकवतो. त्यामुळे मुळातच व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचारही येत नाही. ती पापभीरू बनते, म्हणजे पाप करण्याचे, चुकीची गोष्ट करण्याचे टाळते. त्यामुळे कायद्यांची आवश्यकताच नसते. सत्ययुगात असे होते. तेव्हा राजाही नव्हता आणि कायदेही नव्हते; कारण सर्व जण सात्त्विक असल्याने राजाची अन् कायद्यांची आवश्यकताच नव्हती. आपणही सर्वांना धर्म … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया !

‘हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर क्षात्रतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत, तर संत आणि सनातन संस्थेसारख्या अन्य संघटना ब्राह्मतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया आहे. ती काळानुसार पूर्ण होणारच आहे. आपण मात्र आपली साधना आणि हिंदु धर्माविषयीचे कर्तव्य म्हणून या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. ‘असे केल्याने आपली … Read more

सकाम साधना आणि आनंदप्राप्तीसाठी साधना

‘एखाद्या इच्छेसाठी (सकाम उद्देशाने) कुणी साधना करत असल्यास साधनेमुळे त्याच्या मनातील ती इच्छा गेल्यावर ‘त्याची वासनापूर्तीसाठी साधना होत नाही’, तर आनंदप्राप्तीसाठी साधना होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?

‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी तन-मन-धनाचा त्‍याग करायचा असतो. त्‍यामुळे आयुष्‍य धन मिळवण्‍यात फुकट घालवण्‍यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्‍याग केला, तर ईश्‍वरप्राप्‍ती लवकर होते.’ – (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले