अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तृतीय महायुद्धाच्या काळात स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करा !

‘कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘घरच्याला किंमत नसते’, ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !

‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे माहात्म्य !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्‍वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रज-तमाचे प्रदूषण हे सर्व प्रदूषणांचे मूळ !

‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत आणि पालक यांमधील भेद !

‘कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ – २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मकार्य करण्याचे महत्त्व !

‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तिस-या महायुद्धाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सक्षम होणे आणि स्वतःचे रक्षण होणे यांसाठी तीव्र तळमळीने साधना करा !

‘तिसरे महायुद्ध जसे जवळ येत आहे, तशी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी वाईट शक्ती साधक आणि समाज यांवर आक्रमण करत होत्या. आता आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने, तसेच तिसरे महायुद्ध जवळ आल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाचे प्रमाणही त्या तुलनेत वाढत चालले आहे. आता वाईट शक्ती संतांवरही आक्रमण करत असल्याचे लक्षात आले … Read more