धर्मातील आश्रमप्रणालीचा अर्थ !

‘हिंदु धर्मात ‘वर्णाश्रम’, म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जीवनपद्धत सांगितली आहे. त्यातील वर्ण म्हणजे जात नव्हे, तर साधनेचा मार्ग. आश्रम चार आहेत – १. ब्रह्मचर्याश्रम, २. गृहस्थाश्रम, ३. वानप्रस्थाश्रम आणि ४. संन्यासाश्रम. त्यांचा अनुक्रमे अर्थ आहे – १. ब्रह्मचर्यपालन, २. गृहस्थजीवनाचे पालन, ३. गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुनीवृत्तीने वनात रहाणे आणि ४. संन्यासजीवनाचे पालन. या चारही … Read more

विविध विषयांतील तज्ञ आणि संत

‘व्यावहारिक जीवनात डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळ्यांचा आजार होतो. हृदयरोगतज्ञ डॉक्टरांना हृदयाचा विकार होतो. मनोविकारतज्ञांना मानसिक विकार झाल्याचेही आढळते; परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ वर्षे कुठेही बाहेर जाऊ शकत नसल्यामुळे प.पू. डॉक्टरांना झालेले लाभ !

‘पूर्वी मला वाटायचे, ‘झाडे, डोंगर इत्यादी एकाच जागी उभे असतात. त्यांना त्याचा कंटाळा येत नसेल का ?’ याचे उत्तर माझ्या आजारपणाने मला दिले. गेली ७ वर्षे मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, तरी केवळ खिडकीतून दिसणार्‍या दृश्याला पाहून मी आनंदी आहे. असेही म्हणता येईल की, ‘परिस्थितीबद्दल तक्रार न करता आहे ती स्थिती स्वीकारून आनंदी कसे … Read more

कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले विविध धर्म (पंथ), तर कुठे अनादि हिंदु धर्म !

गेल्या १४०० वर्षांपूर्वी या जगात एकही मुसलमान नव्हता, २१०० वर्षांपूर्वी या जगात एक ख्रिस्ती नव्हता, २८०० वर्षांपूर्वी या जगात एकही बौद्ध वा जैन नव्हता आणि ३५०० वर्षांपूर्वी या जगात एकही पारसी नव्हता; मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची निरर्थकता !

‘आद्य शंकराचार्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी नव्हते, हे बरे. नाहीतर त्यांनी मुलांना घरदार सोडून आश्रमात जायला साधना करायला विरोध केला असता आणि जग त्यांच्या अप्रतिम ज्ञानाला कायमचे मुकले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धा !

‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तृतीय महायुद्धाच्या काळात स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करा !

‘कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले