कुळाचाराचे पालन करा !

ईश्वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन मनाची एकाग्रता मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरे ज्ञान

माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आध्यात्मिक प्रगतीचे महत्त्व आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !

परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंचा शोध घेऊ नये ! खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

न्यूनगंड बाळगू नका !

आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे ! भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !

जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होय. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा ! गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरे दान

खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसऱ्यांजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन श्रमाची कास धरा ! ईश्वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

आत्मप्रौढी नको !

स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मंत्रजपाचे महत्त्व

समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

बुद्धीवाद संपल्यावर ईश्वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे

बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन खरा एकांत माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

प्रत्येक कृती परमेश्वरी कार्य म्हणून करा !

जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्वर आपल्यापासून फार दूर नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका ! जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन