अधर्म म्हणजे पुरोगामित्व !

नीती, प्रामाणिकपणा, अस्मिता वगैरेंचा लेशदेखील या युरोपियन गोर्‍यांत आढळायचा नाही. अधर्म हा धर्म झाला आहे. यालाच पुरोगामित्व म्हणतात. तीच प्रगती ! तीच आधुनिकता ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (आचारधर्म, पृ. ८.)

स्वकर्मत्यागाने सर्वांची अधोगती !

अमेरिका आणि युरोप येथे पूर्वी संसार आणि मातृपद हा धर्म होता; परंतु सुधारलेल्या पश्चिमेत त्या स्त्रियांना स्वधर्म न पाळता आल्यामुळे त्यांना सर्व आधीव्याधींनी पछाडले. अशा तऱ्हेचा कर्मत्यागरूप वर्णसंकर जगभर वणव्यासारखा पसरला. त्यामुळे अर्थ-कामावर व्यक्तीची दृष्टी खिळली. मग ‘वंशसंकर फैलावला. विद्यादानाची शक्ती नसलेले शिक्षक पैशाकरिता ज्ञानदान करीत आहेत. प्रजा रक्षणाकरिता नेमलेले अधिकारी प्रजा भक्षक झाले आहेत. … Read more

कलियुगातील आध्यात्मिक गुरू !

हे कलियुग आहे. हे दांभिकपणा आणि ढोंगीपणा यांचे युग आहे. आजच्या युगातले काही स्वामी जे शिकवितात, ते स्वतः ते आचरणात आणत असतीलच असे नाही. काही आध्यात्मिक गुरु लबाड असू शकतात. याचा असा अर्थ नाही की, आध्यात्मिक गुरु प्रामाणिक असूच शकत नाहीत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (वाङ्मय पत्रिका घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक ११)

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

पतीला पत्नीचे नियंत्रण नको आणि पत्नीला पतीचे नको. दोघांनाही स्वातंत्र्य हवे. विवाहामुळे, विशेषतः स्त्री-स्वातंत्र्यावर बंधने येतात; म्हणून आजची स्त्री बंधनमुक्त होऊ इच्छिते. तिला स्वातंत्र्य (?) हवे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. काही मर्यादा सांभाळाव्याच लागतील. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिरुचीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ही केवळ स्वैराचाराची वेगळी नावे आहेत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (स्त्री-धर्म – ६, नोंदणी विवाहाच्या निमित्ताने…, पृ. … Read more

औद्योगिक संस्कृतीचा भस्मासूर

आज औद्योगिक संस्कृतीने भयंकर धुमाकूळ घातला आहे. यंत्रांची इतकी बेसुमार वाढ झालेली आहे की, ही यंत्रे बाजूला सारली नाहीत, तर तीच आपल्याला खाऊन टाकतील. Stop machines, otherwise they will stop you ! या औद्योगिक संस्कृतीने कसा धुमाकूळ घातला आहे पहा. संपूर्ण पृथ्वीच या कंपन्यांच्या मालकीची झाली आहे. कडुलिंबाचे, बासमती तांदुळाचे पेटंटच नव्हे, तर बौद्धिक स्वामित्व … Read more