राज्यकर्त्यांनो, हे लक्षात घ्या ! षड्रिपुंमुळे नष्ट झालेले अनेक राजे, तर जितेंद्रिय असल्याने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवणारा परशुराम
अनेक राजे इंद्रियांचे दास बनूनच नष्ट झाले आहेत. रावण आणि कीचक स्त्री वासनेने नष्ट झाले. दुर्योधन मत्सराने समाप्त झाला. शिशुपाल क्रोधाने. प्रजेवर प्रचंड कर लादणारा अभिजित राजा लोभाने नष्ट झाला. जितेंद्रिय परशुरामाने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवली. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २०१०)